IPL चालू असतानाच क्रिकेट विश्वासाठी वाईट बातमी, मुंबईच्या ‘ह्या’ खेळाडूने घेतला जगाचा निरोप …

Sports

जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सीझन 15 (IPL-15)कडे लागल्या आहेत. मात्र याच दरम्यान एका वाईट बातमीने जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. सर्व क्रिकेटर आणि चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. सुप्रसिद्ध एका क्रिकेटरचे नि-धन झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

राजेश वर्मा यांचे निधन:- सध्या जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारतात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सीझन 15 (IPL-15) वर आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये सर्वच देशांचे मोठे क्रिकेटपटू आपले पराक्रम दाखवतांना दिसत आहेत.

मात्र याच दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईतील दिग्गज क्रिकेटपटूचे आकस्मिक नि-धन झाले आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःखाचा डोंगर कोसळा आहे. तसेच इतर त्यांचे चाहते ही दुःख व्यक्त करत आहे.

या क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला :- राजेश वर्मा, मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज आणि २००६-०७ रणजी करंडक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य, रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने नि-धन झाले. वर्मा अवघे ४० वर्षांचे होते. त्याचा मुंबईचा माजी सहकारी भाविन ठक्कर यांनी त्याच्या मृ-त्यूला दुजोरा दिला आहे . वर्मा, जो आपल्या कारकिर्दीत केवळ 7 प्रथम श्रेणी सामने खेळू शकला, तो 2006-07 मध्ये मुंबईच्या रणजी चॅम्पियन संघाचा महत्त्वाचा सदस्य होता.

देशांतर्गत क्रिकेटमधील नाव:- राजेश वर्माने 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2008 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाबवि-रुद्ध शेवटचा सामना खेळला आहे. त्याने 7 सामन्यात 23 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने 11 ‘लिस्ट ए’ सामन्यांत 20 विकेट घेतल्या आहे.

विश्वचषक विजेते दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या एल्फ अकादमीमध्ये राजेश वर्मा यांनी क्रिकेटचे बारकावे शिकून घेतले आहे. आयपीएलच्या दरम्यान या बातमीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला आहे.

तो यॉर्करसाठी प्रसिद्ध होता :- राजेश वर्माने अल्पावधीतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले आहे. खासकरून तो त्याच्या यॉर्कर बॉलसाठी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होता. एका डावात 97 धावांत 5 ब-ळी घेणे हा त्याचा सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आहे.

याशिवाय राजेशने 4 टी-20 सामन्यात 5 विकेट घेतल्या. राजेश वर्मा यांनी शेवटचा निरोप घेतला आहे. हे आज आपल्यात नाही याचे खूप दुःख होत आहे. तर सर्वानी कंमेंट बॉक्स मध्ये त्यांनच्या आत्म्याला शांतता प्राप्त होवो अशी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा.

Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *