‘इन आंखों की मस्ती…’ या गाण्याचे लाखों चाहते आहेत. हे गाणं ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. रेखा यांनी अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. रेखा त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. त्यांची चित्रपट कारकीर्द जितकी यशस्वी आहे. तितकीच त्यांचे वैयक्तिक आयुष्यात खडतड प्रवास केला आहे.
आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी रेखा यांनी लहान वयातच चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. कौटुंबिक परिस्थिती गरीब असल्याने रेखाच्या आईने तिचे शिक्षण अर्धवट सोडून तिला काम करण्यास सांगितले होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी चित्रपटात पाऊल ठेवले. रेखाने त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रेखा यांना त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि एकदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर रेखा यांना भारतातील सर्वात मोठा सन्मान पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे. एक यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपट विश्वात आपले स्थान निर्माण केले. रेखा यांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. पण खऱ्या आयुष्यात त्यांच्या अनेक प्रेम कहाण्या अपूर्णच राहिल्या.
मनोरंजन विश्वात काम करत असताना रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले आहे. एकदा, तिने 12 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमार देखील त्यांचा क्रश असल्याचे सांगितले होते. अमिताभ बच्चनसोबतची रेखा यांची प्रेमकहाणी जगभर प्रसिद्ध आहे. बॉलिवुड अभिनेत्री रेखाचे नाव राज बब्बर, संजय दत्त आणि विनोद मेहरा यांसारख्या अभिनेत्यांसोबतही जोडले गेले आहे.
रेखाने बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण तब्बल ६ महिन्यांनी त्यांच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली, याचा संपूर्ण दोष रेखालाच दिला गेला. त्यामुळे तिला अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. परंतु , त्यावेळी तिने शांत रहण्याचा मार्ग निवडला. मात्र, पतीच्या निधनानंतर बऱ्याच दिवसांनी रेखाने आपले मौन तोडत अनेक धक्कादायक विधाने केली.
रेखा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी रेखा यांनी मुलगी झाली तर ती हुबेहुब कंगना राणौतसारखीच असेल असे म्हटले होते. त्यानंतर रेखा प्रचंड चर्चेत आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी रेखा आणि कंगना एका इव्हेंटमध्ये दिसल्या ज्यामध्ये दोघांमध्ये खास बॉ’न्डिंग पाहायला मिळाले.
रेखा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, सेक्सशिवाय तुम्ही पुरुषाच्या जवळ येऊ शकत नाही. मी कधीच गरोदर राहिली नाही हा योगायोग आहे. प्रेमातील सेक्स ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि जे म्हणतात की स्त्रीने फक्त हनिमूनलाच सेक्स केला पाहिजे, ते फालतू बोलतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. लेखक यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या चरित्र्यावर आधारित एक पुस्तक लिहिले आहे.
रेखा यांचे लग्न लोकांसाठी नेहमीच एक कोडे राहिले आहे. त्याचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडले गेले आहे. त्यावेळी शशी कपूर वगळता बॉलीवूडमधील सर्वांनी त्यांना मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूसाठी जबाबदार मानले होते. या सर्व गोष्टींवर रेखा म्हणाली होती की, “मी दररोज नरकातून जात आहे, ते फक्त मला माहीत आहे”
तसेच, त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, माझी व्यथा आणि सत्य कोणालाच न सांगण्याचा मार्ग मी निवडला आहे. माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडून गेल्यावरही माझा लोकांवर विश्वास आहे, लोकांना फक्त माझ्या लग्नाबद्दल माहिती आहे, जे काही लिहिले आहे त्यापेक्षा जास्त त्यांना काहीच माहिती नाही.