बॉलीवुड सोडून क्रिकेटचे मैदान गाजवताना दिसली जाह्नवी कपूर, नेट प्रॅक्टिस चा व्हिडिओ झाला व्हायरल क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्या खेळाला जगभरामध्ये पसंती दिली जाते. असा क्वचित एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल की ज्याला क्रिकेट या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट नसेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला क्रिकेट खेळणे आवडत असते.
जेव्हा एखादया स्टेडियमवर मॅच असते, तेव्हा लाखोच्या संख्येत क्रिकेटचे चाहते ती मॅच पाहायला येतात तसेच आपल्या घरामध्ये वातावरण देखील क्रिकेटमध्ये झालेले असते. अनेकदा सारे कुटुंब खेळ पाहण्यासाठी एकत्रित रित्या जमलेले आपल्यापैकी अनेकांनी पाहिले देखील असेल. भारतीयांचा क्रिकेट खेळाशी खूपच घनिष्ट संबंध असतो. क्रिकेट आणि सेलिब्रिटी यांचे नाते खूप जुने आहे.
जेव्हा क्रिकेटची मॅच रंगत असते तेव्हा अनेकदा जाहिराती आपण पाहत असतो. या जाहिराती आपल्याला सेलिब्रिटींची आठवण करून देत असते आणि सेलिब्रिटी देखील आपल्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन करत असतात तसेच मध्ये मध्ये प्रमोशन जाहिराती देखील सेलिब्रिटीच्या आपण पाहत असतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओ मुळे एक गोष्ट आपल्याला कळून चुकली आहे की बॉलीवूड मध्ये देखील या क्रिकेटची झलक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते तसेच क्रिकेटचे चहाते बॉलीवूड क्षेत्रात जास्त प्रमाणात आहे. तसे सांगायला गेले तर काही दिवसांपूर्वी जाह्नवी कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जाह्नवी आपल्याला स्टेडियमवर क्रिकेटच्या मैदानात दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत..
या व्हिडिओमध्ये आपल्याला अभिनेत्री जाह्नवी कपूर क्रिकेट खेळताना दिसत आहे. जाह्नवी कपूर आपल्या सर्वांना माहिती आहे. तिने आतापर्यंत अभिनयाच्या जोरावर आपले आगळे वेगळे स्थान या बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रस्थापित केलेले आहे.
त्याचबरोबर जाह्नवी कपूर आपल्या अभिनयाने इतरांचे मन जिंकतेच पण त्याचबरोबर ती फिटनेसच्या बाबतीत देखील खूपच जागृत असते म्हणूनच कधीकधी स्पोर्ट्स खेळण्याच्या बाबतीत ती पुढे दिसून येते. अनेकदा तुम्ही सर्वांनी जाह्नवी कपूरचे जिमला येता – जाताना चे काही फोटोज व व्हिडिओ देखील पाहिले असतील.
नुकताच जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये जाह्नवी कपूर क्रिकेट सूटमध्ये आपल्याला स्टेडियमवर क्रिकेट खेळताना दिसून येत आहे त्याचबरोबर क्रिकेट स्टान्स मध्ये उभी राहून बॅटिंग देखील करत आहे.
पहिल्यांदा ती वॉर्म अप करते आणि त्यानंतर क्रिजवर जाऊन बॅटिंगसाठी उभी राहते. या व्हिडिओमध्ये जाह्नवी ने आपल्या हातामध्ये बॅट देखील एखाद्या प्रोफेशनल क्रिकेटर सारखी पकडली आहे, यावरून तिला क्रिकेट खेळता येते असे देखील अनेक जण म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी आगळे वेगळे तर्क लावायला सुरुवात केली आहे, त्याचबरोबर काही जणांचे असे देखील म्हणणे आहे की पुढचा चित्रपट हा नक्कीच एखाद्या महिला क्रिकेटर वर जाह्नवी चित्रात करत असावी व त्या चित्रपटांमध्ये क्रिकेटरची भूमिका जाह्नवी करते की काय.
अशा प्रकारचे प्रश्न देखील अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आता वेळच ठरवेल की नेमके काय आहे.. परंतु जाह्नवी कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram