अॅामझोन प्राइम या व्हिडिओची मिर्झापूर २ ही क्राइम वेब मालिका सध्या प्रसिद्ध झाली. या मालिकेमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिवेन्द्रु शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहे. ‘मिर्झापूर’ या मालिकेमुळे कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना या भूमिका नावाजल्या गेल्या.
या पात्रांच्या तोंडी असणारे संवाद आणि दृश्ये तसेच या मालिकेबद्दलच्या अनेक गोष्टी सध्या खूपच चर्चेत आहेत. या प्रमुख कलाकारांसोबतच छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसणारे अनेक कलाकार पण सोशल मिडियावर चर्चेत आले आहेत.
मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजन मधील अखेरच्या भागामधील एक दृश्य नुकतेच सोशल मिडियावर मिम्सच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. यामध्ये बाबुजींचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या सुनेला घरात मोलकरणीचे काम करणारी राधा थांबवते आणि बंदुकीऐवजी ती चाकूने हत्या करण्याचा सल्ला देते. याच दृष्यातील अनेक दृश्ये ही शॉर्ट मिम्स म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मालिकेत ह्या वेळी महिलांची सत्ता दाखविण्यात आली आहे. जर आपण असे विधान केले की, महिलांची पात्रे ही पुरुष पात्रांवर वर्चस्व गाजविताना दिसतात कदाचित ते चूक ठरणार नाही.
पहिल्या भागात महिला भित्री असल्याचे दाखविण्यात आले होते. तर दुसऱ्या भागात म्हणजेच मिर्जापूर २ मध्ये महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. मग गोलू गुप्ता कालीन भैय्याची पत्नी बीना किंवा त्यांची मोलकरीण राधा असो.
मिर्जापूर २ मध्ये स्त्री पात्रांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच तुम्हाला मिर्झापूर 2 च्या प्रत्येक अभिनेत्रीची जवळजवळ ओळख असेलच, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत ज्याच्याबद्दल तुम्हाला फार माहिती नसेल.
मिर्जापूर मधील कालीन भैय्या यांची मोलकरीण राधा सगळ्यांनाचा परिचित असेलच. आपल्या छोट्याश्या भूमिकेने तिने प्रेक्षकांवर आपला ठसा उमटवला. यामध्ये राधाची भूमिका केली होती अभिनेत्री प्रशंसा शर्मा हिने. मिर्झापूरच्या दोन्ही भागांमध्ये छोटीशी भूमिका करणारी राधा हे मोलकरणीचे पात्र अनेकांच्या लक्षात राहिले आहे.
संपूर्ण मालिकेमध्ये अतिशय घाबरलेली हीच ती राधा आहे, पण तिचे शोषण करू पाहाणार्या् मुन्ना त्रिपाठी आणि सत्यनंद त्रिपाठी यांचा ती शेवटी बदला घेते त्यांनी तिच्या केलेल्या शोषणाचा बदला म्हणून. सिरियलमधली राधा म्हणजेच प्रशंसा शर्मा तिच्या खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे आपणास माहिती आहे का? जर आपण तिचे इंस्टाग्राम वरील फोटो पाहिले, तर आपण तिचे मादक लुक बघू शकाल.
प्रशंसा शर्माचा हिचे जन्मस्थान झारखंड हे आहे. तिने डेहराडून येथील वेल्हम गार्ड शाळेत आपले शालेय शिक्षण घेतले होते. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठामधील हिंदू कॉलेजमधून आपली तत्त्वज्ञान या विषयातील पदवी पूर्ण केली आहे. यानंतर प्रशंसाने मुंबईकडे प्रस्थान केले व येथे राहायला आली. तिने मुंबईतील प्राग फिल्म स्कूल आणि नाटक शाळेत अभिनयाचे शिक्षण घेतले.
मिरजापूरमुळे प्रशंसाला चांगली ओळख मिळाली, पण त्याच्या पूर्वी तिला “बकरीबिट आणि ऑफिस वि” हा चित्रपट केला होता. २०१५ मध्ये तिने प्रथम एका वेबसिरीज मधून या क्षेत्रात पाऊल टाकले. प्रशंसा सध्या मुंबईतच राहाते.
मालिकांमध्ये सर्वांना घाबरून राहणारी ही राधा तिच्या खर्याप आयुष्यात मात्र खूपच मादक आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बघितले तर, तिचे बोल्ड व मादक फोटो बघून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. प्रशंसा ही इतकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच ती उत्तम नर्तकी पण आहे. प्रशंसा भरतनाट्यम पण शिकली आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशंसाने अभिनय क्षेत्रात आपले करियर करण्याचे ठरविले.
View this post on Instagram
View this post on Instagram