अभिनेत्री सारा अली खानने फार कमी काळात आपल्या अभिनयाने आणि स्वभावाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सारा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी आहे.
त्याचवेळी, बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्यात सावत्र आई-मुलीचे नाते आहे. बऱ्याच मुलाखतींमध्ये त्या दोघी एकमेकींबद्दल सांगतात.
करीना कपूर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या लोकप्रिय रेडिओ शोमध्ये आमंत्रित करते. यावेळी तिने आपली सावत्र मुलगी सारा अली खान हिला शोमध्ये आमंत्रित केले. मात्र, शोदरम्यान करिनाने साराला असे काही विचारले की ती लाजली. करीनाने साराशी आधुनिक नातेसंबंधांवर चर्चा केली. यादरम्यान तिने साराला विचारले की, तिने कधी खोडकर मेसेज पाठवले आहेत का?
त्याचवेळी करिनाने असेही म्हटले की, मला याबद्दल जाणून घ्यायचे नाही आणि आशा आहे की तुझे वडील हा एपिसोड पाहत नाहीत. करिनाच्या या प्रश्नावर सारा अली खान लाजून हो म्हटली. यासोबतच करीना कपूरने साराला म्हटले की मला विचारले नाही पाहिजे .
पण आपण मॉर्डन लोक आहोत. कधी वन नाइट स्टॅण्ड केले आहेस. वन नाइट स्टॅण्ड म्हणजे कोणासोबत तरी एक रात्र व्यतित करणे. करीना कपूरच्या या प्रश्नावर सारा अली खानने थोडे आडेवेडे घेत उत्तरात सांगितले की मी असे कधीच केले नाही. त्यानंतर करीना सुटकेचा निश्वास घेतला.
साराने करीनाला सांगितले की, तिने कधीही रिलेशनशिपमध्ये फसवणूक केली नाही. एवढेच नाही तर साराने असेही सांगितले की, ती कधीही तिच्या पार्टनरचा फोनही चेक करत नाही.सारा तिच्या सहकलाकारांबद्दलही बोलली. तिच्या म्हणण्यानुसार, तिला आपल्या को-स्टारला कधीही नाकारण्याची गरज नव्हती. सारा म्हणाली की, माझे माझ्या सर्व सहकारी कलाकारांसोबत व्यावसायिक आणि उत्कृष्ट सं’बंध चांगले आहेत.
दरम्यान, एकदा माध्यमांशी बोलताना सारा म्हणाली की, जेव्हा साराला विचारले गेले की तुझी सावत्र आई करीना कपूर खानला काय सांगायचे आहे? यावर सारा म्हणाली होती- ‘मी नेहमीच करीना कपूरची फॅन आहे. ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘पू’ ही माझी सावत्र आई आहे हे माझ्यासाठी आश्चर्यचकित होते.
साराच्या म्हणण्यानुसार, जेव्हा वैयक्तिक नातेसंबंधांचा विचार केला जातो तेव्हा मला नेहमी असे वाटत होते की जो माझ्या वडिलांना आनंद देईल त्याच्यासोबत मी आनंदी राहावे, मग तो कोणीही असो. मी आणि करीना मैत्रीनी आहोत आणि आमचं खूप छान बॉन्डिंग आहे.
करीना आणि सारा दोघींमध्ये आई-मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नात अधिक आहे. सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं.त्यानंतर करिनानेही तैमुरला जन्म देत बॉलिवूडपासून ब्रेक घेत संसारात रमली.
दरम्यान, सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. 2004 मध्ये दोघांचा घटस्फो’ट झाला. यानंतर सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले. सैफला अमृतापासून एक मुलगा आहे, त्याचे नाव इब्राहिम आहे.