मानवी स्वभाव हा त्याचा वागणुकीचा एक गुणधर्म असतो. जर तुमचा स्वभाव चांगला असेल तर लोक तुमचे कौतुक करतात परंतु जर तुमचा स्वभाव विचित्र असेल, तुम्ही रागिष्ट असाल तर लोक तुमच्या आजूबाजूला देखील फिरत नाही परंतु तुमच्या स्वभावातील गोडव्यामुळे लोक तुमच्या जवळ येतात, परंतु तुम्ही रागिष्ट असाल तर लोक तुमच्यावर टीका देखील करतात.
हा स्वभाव प्रत्येक क्षेत्राला लागू असतो. आपल्या आजूबाजूला देखील असे अनेक व्यक्ती आहेत, त्यांचा स्वभाव हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो म्हणूनच त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील आपण देत असतो. बॉलीवूड क्षेत्रामध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या वागणुकीमुळे मैत्रीमुळे आणि व्यवहारामुळे ओळखले जातात.
अनेक जण हृदयामध्ये राहतात तर अनेक जण आपल्या डोक्यामध्ये फिरण्याचा प्रयत्न करत असतात. या क्षेत्रामध्ये असे देखील काही कलाकार आहेत जे त्यांच्या रागामुळे ओळखले जातात. त्या कलाकारांना राग आला तर होत्याचे नव्हते होऊन जाते म्हणूनच अनेकदा माध्यमांसमोर देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात कलाकारांचा रागाचा पारा हा वाढला आहे. अनेकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींवर देखील हल्ला केलेला आहे,अशा अनेक घटना तुम्ही देखील ऐकले असेल, वाचल्या असतील आणि पाहिल्या देखील असतील!.
आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड क्षेत्रातील अशा काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा रागाचा पारा नेहमी वाढलेला असतो म्हणूनच त्यांच्या आजूबाजूला देखील कोणी जास्त प्रमाणात फिरकत नाही.. बॉलीवूडमधील सर्वात हँडसम बॉडी बिल्डर अभिनेता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सलमान खानचे नाव येते. बॉलीवूड मधील हा दबंग अभिनेता आहे.
सलमान खानचा राग हा प्रत्येकाला माहिती आहे. अनेकदा माध्यमांवर देखील त्याने व्यक्त केलेला आहे. बिग बॉस मध्ये सलमान खान आपल्या सर्वांना दिसला होता. या कार्यक्रमाचे होस्टिंग सलमान खानने केले होते. या कार्यक्रमादरम्यान त्याला आलेला राग अनेकांनी अनुभवला देखील आहे. सलमान खानच्या रागाला बॉलीवूड क्षेत्रातील अनेकांनी सामोरे गेलेले आहेत.
अनेकांना त्याच्या रागाचा परिणाम देखील भोगावा लागला आहे, असे देखील काही कलाकार आहेत ज्यांचे करिअर पूर्णपणे बुडाले आहे. इतका राग सलमान खानला येतो आणि म्हणूनच सलमान खानच्या नादाला शक्यतो कोणी लागण्याचा प्रयत्न करत नाही. जो व्यक्ती सलमान खानच्या नादाला लागतो त्याचे आयुष्य नरकमय होऊन जाते याची प्रचिती अनेकांना आली देखील आहे..
सर्वांचा लाडका सिंघम म्हणजेच अजय देवगन. अजय चा स्वभाव देखील काही प्रमाणात शांत अशांत आहे परंतु टेलिव्हिजन स्क्रीनवर किती ही संयमी आपल्याला दिसत असला तरी अजय प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूपच रागिष्ट आहे. अनेकदा त्याचा राग हा निकटवर्ती यांनी पाहिला देखील आहे. जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो कोणाचे ऐकत नाही. राग आल्यावर अजय देवगनला शांत करणे मुश्किल होऊन बसते..
नाना पाटेकर हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. नाना पाटेकर यांनी बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्री मध्ये आपले आगळे नाव निर्माण केलेले आहे. नाना पाटेकर समाजकार्य देखील करतात. इतके सारे करून देखील त्यांचे नाव अनेकदा चर्चेमध्ये येत असते परंतु ही चर्चा अनेकदा वाईट देखील होते, कारण की नाना पाटेकर यांना राग लवकर येतो. एकदा का नाना यांना राग आला की ते कोणाचे राहत नाही. राग आल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींवर देखील त्यांनी अनेकदा ओरडले आहेत आणि आपल्या स्पष्ट स्वभावामुळे टीकेचे धनी देखील झाले आहेत.
सनी देओल हा बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सनीने आतापर्यंत बॉलीवूड इंडस्ट्री मधील वेगवेगळ्या चित्रपटात काम देखील केलेले आहे. चित्रपटांमध्ये अँग्री यंग मॅन म्हणून आपल्यासमोर येणारे सनी देओल प्रत्यक्ष लाइफ मध्ये देखील तितकेच रागिष्ट आहे त्यांच्या रागाचे अनेक किस्से प्रचलित आहेत. एक अभिनेता म्हणून जेव्हा जेव्हा ते समोर आलेले आहेत तेव्हा त्यांचा रागाचा पारा नेहमी चढलेला आहे. जेव्हा सनी देओल ला राग येतो, तेव्हा तो लवकर आपल्या रागावर नियंत्रण करू शकत नाही आणि याचा परिणाम अनेकदा वाईट देखील झालेला आहे..
आपल्या सर्वांचा लाडका संजय दत्त म्हणजे संजूबाबा. संजय याच्या रागाचे किस्से देखील खूपच चर्चेत आहेत. संजय दत्तच्या अनेक निकटवर्ती यांनी याबद्दल अनुभव देखील व्यक्त केलेला आहे. आतापर्यंत असे अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये वाद आणि संजय दत्त हे एक समीकरणच बनलेले आहे म्हणूनच शक्यतो कोणतीही व्यक्ती संजय दत्त बरोबर पंगा घेत नाही व असा प्रयत्न देखील करत नाही…
अक्षय कुमार अनेकदा अभिनयाच्या अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत लाखो हृदय जिंकलेले आहे परंतु जेव्हा आपण त्याच्या प्रत्यक्ष जीवनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अक्षय कुमार हा एक रागिष्ट व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आहे. हा देखील त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळावेगळा पैलू आहे,असे म्हटले जाते परंतु जेव्हा अक्षय कपूरला राग येतो तेव्हा तो स्वतःचे देखील ऐकत नाही म्हणूनच जर त्याला राग आलेला असताना कोणी जर मध्ये पडले तर त्या व्यक्तीला टिकेला सामोरे जावे लागते…
अर्जुन कपूर बॉलीवूड मधील एक नवोदीत अभिनेता असला तरी वादाच्या बाबतीत अर्जुन कपूर अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत अर्जुन कपूर ने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद, भांडण केलेले आहे.
अनेकदा माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत देखील अर्जुनचे वाजले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलाईका आणि अर्जुन नातेसंबंधत आहेत आणि या संदर्भातल्या बातम्या जेव्हा प्रकाशित केल्या जातात तेव्हा देखील तो आपल्या राग व्यक्त करत असतो. एकदा अशी घटना पत्रकार सोबत घडल्याने अर्जुन कपूर वर टीका देखील करण्यात आली होती.