सुपरस्टार यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ हा रोज नवा इतिहास रचतांना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा वेग कमी होत नाही असे दिसत आहे. या साऊथ चित्रपटामध्ये सुपरस्टार रॉकी भाईचा क्रेझ लोकांच्या मनावर ताबा करत आहे. लोकांना रॉकी भाईचे वेड लागले आहे. यशचा ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट लोकांना खूप आवडलेला आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाचे केवळ चाहतेच नाही तर मोठे कलाकारही खूप कौतुक करताना दिसत आहेत. हिंदी आवृत्तीतही या चित्रपटाला खूप प्रतिसाद मिळत आहे.
कन्नड सुपरस्टार यशचा ‘KGF 2’ हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर येताच धिंगाणा घातला आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात बाहुबली 2, दंगल आणि टायगर जिंदा है सारख्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहे आणि लोकांना त्यांच्या अभिनयाने वेड लावून टाकलं आहे. आज आम्ही तुम्हाला असे सांगणार आहे की, हा चित्रपट पहिल्यांदा पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झाला आहे.
अशा परिस्थितीत देशभरात या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हा चित्रपट इतका उत्तम चित्रपट ठरला आहे की, लोक हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात लोकांना हा चित्रपट पाहण्यासाठी तिकीटही मिळणे शक्य होत नव्हते, मात्र आता हा चित्रपट पाहण्यासाठी तिकिटे सर्व चाहत्यांना दिली जात आहेत. हा चित्रपट पाहून लोक या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे खूप कौतुक करत आहेत.
या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटामध्ये साऊथचा सुपरस्टार अभिनेता यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त प्रसिद्ध खलनायक अधीराच्या भूमिकेत दिसला आहे. एवढेच नाही तर, बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रवीना टंडनही या चित्रपटात दिसली आहे. हे कलाकार आहे हे तुम्हाला सर्वांला माहीतच आहे. यासोबतच या चित्रपटात आणखी एक नवीन कलाकार आहे, ज्याची सध्या देशभर चर्चा होत आहे. ‘KGF 2’ या चित्रपटातील भयानक खलनायक एंड्रयूजची सध्या देशभर चर्चा होत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की, या चित्रपटात बी.एस. अविनाश दिसला आहे आणि आज या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीमुले खूप लोकांना तो आवडायला लागला आहे.
खऱ्या आयुष्यात अविनाश कोण? :- बी.एस. अविनाश यांचा जन्म 29 ऑगस्ट 1974 रोजी कर्नाटकामध्ये झाला होता. त्याने म्हैसूर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.आणि त्याला लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीत करिअर बनवायचे होते, त्यामुळेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याने लगेचच थिएटरमध्येही प्रवेश घेतला होता, पण वडिलांच्या नि-धनानंतर अविनाशने आपला व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली आणि व्यवसायामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्व गोष्टीच ओझं त्याच्या खांद्यावर पडले. त्याचे अभिनयाचे स्वप्न स्वप्नच राहिले. शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर अविनाशने 2014 मध्ये अभिनेता चिरंजीवी सर्जा यांची भेट घेतली आणि त्यांनी अविनाशला अभिनेता होण्यासाठी मार्गदर्शन केले.
अविनाशला फिटनेसची खूप आवड :- B.S. अविनाश केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही स्टायलिश राहतांना दिसत आहे. अविनाशला फिटनेसची खूप आवड आहे. तो रोज काही तास जिममध्ये घालवत असतो. वयाच्या ४८ व्या वर्षीही तो आजही पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे आणि यश या चित्रपटाच्या नायकाला टक्कर देत आहे. फिटनेससोबतच त्याला धावण्याचीही खूप आवड आहे. अविनाशने 2012 साली म्हैसूर येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये 21 किमी धावला आहे.