श्रीराम नेने सोबत पहिल्यांदा डे’टवर गेल्याचा माधुरी दीक्षित ने शेअर केला किस्सा, डे’टवर इतकी घाबरली की पुढे जे झालं ते थक्क करणारे होते !…

Bollywood Entertenment

बॉलीवूड मध्ये वेगवेगळे कपल प्रसिद्ध आहे, जसे की काजल -अजय देवगन, ऐश्वर्या – अभिषेक बच्चन, जया बच्चन – अमिताभ बच्चन, शाहरुख- गौरी हे सगळे कपल जरी एकाच क्षेत्रांमध्ये असले तरी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व असलेले कपल देखील अनेकदा माध्यमांमध्ये चर्चा मिळवत असतात.

त्यापैकी एक महत्त्वाचे आणि सर्वांचे आवडते कपल म्हणजे माधुरी आणि श्रीराम नेने. या दोघांची जोडी तुम्हा सर्वांना माहिती असेल डॉक्टर श्रीराम हे पेशाने डॉक्टर आहेत. बॉलीवूड क्षेत्राशी त्यांचा काडी मात्र सं’बं’ध नाही परंतु माधुरी दीक्षितच्या निमित्ताने अनेकदा ते चर्चेमध्ये येत असतात.

अनेकदा टेलिव्हिजन शोमध्ये किंवा अवॉर्ड फंक्शन मध्ये हे दोघे आपल्याला एकत्र दिसत असतात. आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती सांगणार आहोत, ही माहिती खुद्द माधुरी दीक्षितने शेअर केलेली आहे आणि ही माहिती त्यांच्या डे’टवर गेल्यानंतर काय घडले होते त्या संदर्भात आहे….

 

 

अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका इंटरव्यू मध्ये आपल्या पहिल्या डेटबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या, तसेच पहिली डे’ट कशी घडली?.. त्या डेट मध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी दोघांमध्ये घडल्या, याच्याबद्दल देखील माधुरी दीक्षित ने माध्यमांवर घेतलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले.

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने प्रदीर्घ कालावधीपासून लोकांच्या हृदयावर तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य केलेले आहे. अद्याप ही ती करतच आहे. माधुरीने आतापर्यंत एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मजबूत कामगिरी केलेली आहे.

ज्या ज्या चित्रपटांमध्ये माधुरीने काम केले आहे, ते चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत आणि या सर्व चित्रपटांनी बॉलीवूड वर विशेष गल्ला देखील जमवला आहे. माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्री तर आहे पण त्याचबरोबर ती एक क्लासिकल डान्सर देखील आहे.

आपल्या मनमोहक अदाने तिने नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे. माधुरी जेव्हा करिअरच्या यशस्वी शिखरावर पोहोचली होती त्याच दरम्यान माधुरीचे लग्न वर्ष 1999 मध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत झाले. लग्नानंतर माधुरी अमेरिकेला निघून गेली.

 

 

असे म्हटले जाते की, श्रीराम नेने यांना अजिबात माहिती नव्हते की, माधुरी ही बॉलीवूड क्षेत्रामधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एवढेच नाही तर माधुरीच्या घरी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, गोविंदा यासारखे प्रसिद्ध लोकांचे येणे जाणे असते याबद्दल देखील माहिती नव्हती.

एके दिवशी जेव्हा हे सारी मंडळी माधुरी दीक्षित यांच्या घरी आली तेव्हा माधुरी दीक्षित एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे असे कळाले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, डॉक्टर नेने यांची माधुरी दीक्षित सोबत असलेली पहिली डेट खूपच वेगळी वेगळी होती.

ज्यामुळे माधुरी दीक्षित खूपच विचलित झाली होती. या सर्व गोष्टी स्वतः माधुरीने एका इंटरव्यू मध्ये सांगितल्या आहेत. काही वर्षांपूर्वी माधुरी दीक्षित सिमी गरेवाल यांच्या टॉप शोमध्ये आल्या होत्या. या दरम्यान श्रीराम नेने सोबत केलेल्या डेटचा उल्लेख त्यांनी या कार्यक्रमांमध्ये केला.

माधुरी दीक्षित ने अनेक वेगवेगळे किस्से देखील या कार्यक्रमांमध्ये सांगितले जसे की जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा श्रीराम नेने यांनी मला सांगितले की चला माऊंटनवर बायकिंग करायला आपण जाऊया.. पण मी तुम्हाला खरं सांगू का, गेल्या वीस वर्षांमध्ये मी कधी सायकल देखील चालवली नाही..

 

 

तसे तर माउंटिंग करणे मला आवडते म्हणून मी त्यांना म्हटले की चला ठीक आहे!.. घरी गेल्यावर मी ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली तुला काय झालं आहे? तुला माहिती तरी आहे का हे कसे करायचे? यानंतर मी श्रीराम नेने यांच्यासोबत गेली त्यानंतर मला कळाले की माऊंटन बाइकिंग नेमके काय असते!…

अशावेळी मी खूपच घाबरलेली होती, मला नेमकं कळतच नव्हतं पुढे काय करावे… परंतु इतकं सारे असून देखील मी माउंटन बाइकिंग केली. माझ्या या साहसाला बघून डॉक्टर नेने खूपच प्रभावित झाले होते त्याचबरोबर माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने यांची पहिली भेट भावाच्या पार्टीत म्हणजेच लॉस एंजेलिसला झाली होती.

सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री राम यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी एक अभिनेत्री आहे,याबद्दल देखील यांना काहीच माहिती नव्हती त्याच बरोबर मी बॉलीवूडमध्ये काम करते हे देखील यांना माहिती नव्हते…

माधुरीने श्रीराम यांच्या सोबत 17 ऑक्टोंबर 1999 ला लग्न केले. लग्नानंतर माधुरी डॉक्टर नेने सोबत युएस ला शिफ्ट झाली होती त्यानंतर थोडे दिवस चित्रपटांपासून लांब राहून स्वतःचा संसार देखील सांभाळला.

आता माधुरी बॉलीवूड मध्ये आलेली आहे त्याचबरोबर ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जज म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळते, अशा प्रकारे माधुरीने आपले डेटच्या वेळी घ’डलेल्या घ’टना, वेगवेगळे किस्से माध्यमांशी शेअर केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *