बरेच लोक लहानपणापासूनच स्वप्न पाहतात की ते नायक किंवा नायिका होतील आणि चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडतील. हे क्षेत्र एकमेव आहे.
ज्यामध्ये आपल्या नावासह आपल्याला भरपूर पैसा आणि मान्यता मिळते, परंतु यासाठी आपल्याला खूप परिश्रम करावे.बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर पदार्पण करतात, त्यापैकी काही बॉलीवूड कलाकारांची मुलं किंवा मुलीही असतात.
दरम्यान, काही कलाकारांची मुलं प्रचंड मेहनत करून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. तर त्यांच्या या मेहनती मागे मोठं मोठ्या कलाकारांचे हात असतात.
अनेक कलाकारांनी आपल्या मुलांना यश प्राप्त व्हावे, त्यांनी बाॅलिवूड इंडस्ट्रीत नाव गाजवावे म्हणून प्रयत्न करतात. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे असे कलाकार.
अभिषेक बच्चन :-बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक बच्चनचे करिअर यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत करताना दिसले.
अभिषेकने ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र, या चित्रपटानंतर अभिषेकने अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले आहेत. चाहते अजूनही अभिषेक बच्चनचा ब्लॉकबस्टर चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हर्षवर्धन कपूर :-अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने ‘मिर्झ्या’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यानंतर तो ‘भावेश जोशी सुपरहिरो’मध्ये दिसला आणि त्याचा तो चित्रपटही फ्लॉप झाला.
सुनील आनंद:-बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंदची अभिनय कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले होते जे प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले.
तुषार कपूर :-जितेंद्र यांनी 80 च्या दशकात एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर यानेही वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची अभिनय कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. तुषार कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला एकही हिट चित्रपट देता आलेला नाही.
विशाल कुमार आणि कुणाल :-मनोज कुमार यांनी त्यांच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत परंतु त्यांचे दोन्ही मुले विशाल आणि कुणाल अभिनय जगतात आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले आणि लवकरच मोठ्या पडद्यावरून गायब झाले.
महाक्षय चक्रवर्ती :- मिथुन चक्रवर्ती यांनाही त्यांच्या मुलांची यशस्वी कारकीर्द बॉलिवूडमध्ये पाहायची होती. मात्र, आता त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा मुलगा महाक्षय बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाला. तर मिथुन अजूनही कार्यरत आहे.
करण देओल :-सनी देओलने आपला मुलगा करण देओलचे करिअर घडवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. अभिनेत्याने आपल्या मुलासाठी ‘पल पल दिल के पास’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, करण या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
गौरव कुमार :-राजेंद्र कुमार हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. आपला मुलगा गौरव कुमार याने इंडस्ट्रीत वेगळे स्थान निर्माण करावे, अशी राजेंद्र कुमारची इच्छा होती, परंतु त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.
ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर :-राज कपूर यांनी त्यांची मुले ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांची कारकीर्द घडवण्यातही पूर्ण ताकद लावली होती. मात्र, या तीन मुलांपैकी ऋषी कपूर यांच्याकडे सर्वाधिक हि ट चित्रपट आहेत.
त्याच वेळी राजीव कपूर यांची अभिनय कारकीर्द अयशस्वी ठरली. रणधीर कपूर यांनीही त्यांच्या काळात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संजय दत्त :-सुनील दत्त हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते.
त्यांचा मुलगा संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. ही यादी पाहता, सुनील दत्त हा एकमेव अभिनेता आहे ज्याने आपला मुलगा संजय दत्तला यशस्वी अभिनेता बनवण्यात यश मिळवले आहे.