आपल्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा वा’दात सापडलेला भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान होय . सलमान खान अनेक कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच भाईजान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असुन यावेळी तो त्याच्याघरामुळे चर्चेत आला आहे.
प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला इंडस्ट्रीत भाईजान नावाने ओळखले जाते. खऱ्या आयुष्यामध्ये सलमान खानची प्रतिमा ही बरीचशी वा’दग्र’स्त राहिली असुन तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. हिट अँड रन केस, काळवीट शि’कार, अनेक गर्लफ्रेंड्स या गोष्टींमुळे सलमान खानला आयुष्यात अनेक वाईट घ’टनांचा सामना करावा लागला आहे.
दुसरीकडे त्याची पडद्यावरची प्रतिमा मात्र सोज्वळ ‘प्रेम’ किंवा अन्यायाला विरो’ध करणारा ‘हिरो’ अशीच आहे. सलमान खानने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा भाई जान आणि सुपरस्टार सलमान खान यांचं आज जगात खूप मोठं नाव आहे. सलमान खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठे स्थान निर्माण केले आहे.
केवळ सलमान खानचे चाहते आणि प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांच्यावर खूप प्रेम करतात. तसेच त्याला आदर देतात. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. सिनेसृष्टीत बॉडी बिल्डिंगचा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमानचं नाव घेतलं जातं. अनेक नव्या कलाकारांना संधी देण्याचं काम अभिनेता सलमानने केलं आहे.
सलमान खान हा बॉलीवूडचा मोठा अभिनेता आहे. त्यामुळे तो प्रत्येक चित्रपटासाठी मोठमोठी रक्कम घेतो. सलमान खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप मोठी संपत्ती आपल्या नावावर केली आहे. पनवेलमधील फार्म हाऊसशिवाय सलमान खानच्या नावावर अनेक मोठ्या मालमत्ता आहेत, मात्र तो मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत अत्यंत साधे जीवन जगतो.
एकदा माध्यमांशी बोलताना सलमान खानने सांगितले होते की, या छोट्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तो आपल्या कुटुंबासह खूप आनंदी आहे. जेव्हा सलमान खानने मुलाखतीदरम्यान आपल्या घर गॅलेक्सीबद्दल सांगितले तेव्हा त्याने हे देखील सांगितले की हे घर कधीही बदलले नाही कारण त्याचे वडील सलीम खान हे घर सोडू इच्छित नाहीत कारण या घरातून सलीना खानच्या अनेक आठवणी आणि भावनिक जोड आहेत.
सलमान खान त्याच्या वडिलांच्या इच्छेविरु’द्ध जाऊ शकत नाही, त्यामुळे या घराचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आले पण सलमानने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला नाही. सलमान खानच्या घराच्या आतील चित्रांमध्ये असे दिसून येते की सलमान खानचे गॅलेक्सी अपार्टमेंट हे बड्या सुपरस्टारसारखे आलिशान नसले तरी ते सुखी कुटुंबाचे उदाहरण आहे. सलमान खानच्या फॅमिली फोटोमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहे आणि त्याचे घरही खूप सुंदर दिसत आहे.
दरम्यान, सलमान खानचे प्रचंड चाहते आहेत. अभिनेता सलमान खानला नेहमी सांगतो की, तुम्हाला फिट राहायचे असेल तर तुमची दिनचर्या सुधारणे खूप आवश्यक आहे. तुम्हाला पुरेशी झोप आणि वेळेवर जेवण हे करणे खूप गरजेचे आहे. झोपणे, खाणे आणि काम करणे तसेच व्यायामासाठी एक वेळ ठरवून निश्चित करा आणि त्या प्रमाणे दिनक्रम चालू ठेवा.