आपल्या सर्वांना माहितीच आहे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात असे अनेकजण आपल्या आजूबाजूला वावरत असतात. जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा एक वेगळा आहे. परमेश्वराने त्याला काहीतरी वेगळेपण दिलेले आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीचे वेगळेपण या जगामध्ये दिसून येते.
तसे पाहायला गेले तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असे काही गुणकौशल्य असतात, ज्यामुळे त्याला जगात एक वेगळी ओळख प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. ही महिला जगातील सर्वात सुंदर महिला आहे.
या महिलेला उत्कृष्ट सौंदर्यवतीचा किताब देखील बहाल केला गेला आहे. नुकतेच केले गेलेल्या संशोधनानुसार ही महिला प्रत्येक अंगाने अगदी परफेक्ट मानली गेलेली आहे. या महिलेचे नाव केली ब्रुक आहे. ही जगातील सर्वात सुंदर महिला मानली जाते.
वैज्ञानिकांच्या मते, या महिलेचा चेहरा आणि शरीर जगातील सर्वात सुंदर शरीर मानले गेलेले आहे. तिचे शरीर हे जाडे आहे, न बारीक आहे.. तिच्या शरीराची लांबी आणि शरीराचा आकार हे नेमून दिलेल्या मापात अगदी फिट आहे.
ब्रुक ही एक इंग्लिश मॉडेल अभिनेत्री आणि सोशलाईट आहे. हिचे पूर्ण नाव केली ऍन पार्सन्स आहे. 23 नोव्हेंबर 1979 ला केलीचा वाढदिवस असतो. तिचा जन्म इंग्लंड मधील केंट येथील रॉचेस्टर मध्ये झाला.
ग्राजिया पत्रिका साठी 5 हजारापेक्षा अधिक महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वेक्षणामध्ये जे प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नांच्या अनुसरण म्हणजेच महिलेचे वजन, महिलेची उंची,चेहऱ्याचा आकार व शरीरावरील अन्य अवयवांबद्दल प्रश्न विचारले गेले होते.
सर्वेक्षणामध्ये तसेच संशोधन करत असताना महिलांना सुरुवातीला आकर्षक फिगरची नेमकी साईज काय असायला हवी? असे विचारले गेले होते परंतु वेगवेगळ्या महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर दिले.
ब्रुकचे उत्तर हे सगळ्यांपेक्षा वेगळे होते आणि मेडिकल सायन्स नुसार देखील ब्रुक च्या शरीराचा प्रत्येक अवयव हा अगदी परफेक्ट मानला गेला. ब्रुक ही स्वतः एक व्यवसायिक मॉडेल आहे आणि ती युकेमध्ये मॉडेलिंग देखील करते.
ब्रुक ने आतापर्यंत वेगवेगळे टेलिव्हिजन शो मध्ये पाहुणे म्हणून देखील पदार्पण केले आहे, ज्यामध्ये स्ट्रिक्टली कम डांसिंग, द नाइटली शो, लूज वीमेन आणि ब्रिटेन गॉट टैलेंट सीरिज 3 त्या कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांमध्ये तिने परीक्षक म्हणून भूमिका पार पडली आहे.
वयाच्या 18 वर्षी टेलिव्हिजनच्या MTV, ग्रेनेडा टेलीविजन तथा द ट्रबल TV शो वर प्रमुख भूमिका साकारली होती. ब्रूक ला 2005 यावर्षी FHM ची से’क्सि’ए’स्ट ‘वुमन इन द वर्ल्ड’ असा मानाचा किताब देखील देण्यात आला होता.
ब्रुकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास केलीने आतापर्यंत अभिनेत्री म्हणून एब्सोलन, फिशटेल, पिरान्हा 3 डी, कीथ लेमन: द फिल्म, आणि टेकिंग स्टॉक यासारखे चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका देखील साकारली होती.
ब्रुकच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास 16 मार्च 2011 ला ब्रुकने ट्विटरवर ग’र्भव’ती असल्याची बातमी पोस्ट केली होती परंतु त्यानंतर काही कारणाने तिचा ग’र्भ’पा’त झाला होता तसेच 2013 मध्ये ब्रुक आणि इवांन्स यांच्यातील ब्रेकअप च्या घ’टना देखील प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आल्या होत्या..