कुत्रे हे माणसांचे खूप विश्वासू मित्र असतात. या म्हणीमध्ये शंभर टक्के सत्य आहे. हेच कारण आहे कि अनेक लोक आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतात. हा कुत्रा घराची फक्त सुरक्षाच करत नाही तर त्याच्या मालकाला इमोशनल सपोर्ट देखील करतो.
कुत्र्यांच्यासोबत राहिल्याने मूड फ्रेश राहतो आणि टेंशनसुद्धा कमी होते. तसे तर एका घरामध्ये एक किंवा दोन कुत्रेच राहतात. तथापि आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा कलाकाराबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या घरामध्ये ७६ कुत्रे ठेवले आहेत. हा कोणी दुसरा तिसरा कलाकार नाही तर बॉलीवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती आहे.
मिथुन एक अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे. हेच कारण आहे कि त्यांना इतके कुत्री पाळणे परवडते. बातमीनुसार मिथुनची एका वर्षाची कमाई जवळ जवळ २४० करोड इतकी आहे.
मिथुन सध्या चित्रपटापासून दूर असले तरी त्यांचे उत्पन्न विविध हॉटेल्सच्या माध्यमातून होत असते. तुमच्या माहिती साठी सांगतो, Gemini’s Monarch Group च्या अंतर्गत त्यांचे अनेक हॉटेल चालू आहेत. त्यांचे बहुतांश उत्पन्न याच माध्यमातून होते.
आपण इथे मिथुन आणि त्यांच्या कुत्र्यांविषयी असणाऱ्या प्रेमाविषयी बोलत आहोत. मिथुन यांची मुंबईमध्ये दोन घरे आहेत. एक घर बांद्रा मध्ये आहे तर दुसरे मड आइलैंड मध्ये आहे. मिथुनच्या मुंबई येथील घरामध्ये एकूण ३८ कुत्रे आहेत.
याचे मुख्य कारण आहे कि मिथुन एक पशुप्रेमी व्यक्ती आहे. त्यांना प्राण्यांच्या प्रती खूप प्रेम आहे. मिथुन ने कुत्र्यांची देखभाल करणारी एनजीओ Dog Care Center Kenel Club of India सुद्धा जॉईन करून ठेवली आहे. कुत्र्यांशिवाय मिथुन यांच्या घरामध्ये अनेक अनोख्या पक्षांच्या प्रजाती आहेत.
विशेष बाब हि आहे कि मिथुन आपल्या घरातील सर्व प्राण्यांना AC रूममध्ये ठेवतात. या रूममध्ये त्या प्राण्यांना खेळण्यासाठी बरीच खेळणीदेखील उपलब्ध आहेत.
दिवसा सर्व कुत्र्यांना रस्सीने बांधून ठेवले जाते आणि रात्र होतात त्यांना मोकळे सोडले जाते. इतके सारे कुत्रे असल्यामुळे मिथुन यांचे घर मुंबईमधील सर्वात सुरक्षित घर समजले जाते.
मिथुनच्या मुंबई येथील घराशिवाय त्यांच्या उटी येथील घरामध्ये ७६ कुत्रे आहेत. अशामध्ये मिथुनच्या मुंबई येथील घराशिवाय त्यांच्या उटी येथील घरामध्ये ७६ कुत्रे आहेत.
मिथुन जेव्हा कधी उटी स्थित आपल्या घरामध्ये जातात त्यावेळी तिथे ते आपल्या कुत्र्यांसोबत एक चांगला वेळ व्यतीत करतात. हि एक चांगली गोष्ट आहे कि मिथुन सारखे कलाकार देखील आपल्या पैशाचा योग्य वापर करत आहेत. प्राण्यांवरील प्रेमापोटी ते समाजात एक चांगला संदेश देत आहेत.
मिथुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मिथुन शेवटचे २०१५ मध्ये आलेल्या हवाईजादा चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. यानंतर ते चित्रपटामधून गायब झाले.
मिथुनचे सध्या ६७ वर्षे इतके वय झाले आहे. अशामध्ये आता ते जास्त चित्रपट करू इच्छित नाहीत. ते फक्त या वयामध्ये जास्तीत जास्त आपला वेळ आपल्या कुटुंबासोबत आणि पाळीव प्राण्यांसोबत घालवतात.