आनंद पिरामल हे बडे उद्योगपती पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांचे पुत्र आहेत. आनंद पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर आहे. याशिवाय त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रशासनात मास्टर्स केले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी मुकेश अंबानी यांच्या मुलीचे लग्न 2018 साली प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले होते.महाबळेश्वरच्या मंदिरात अंबानी यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा झाला. याच कार्यक्रमात आनंद पिरामलनं इशाला ‘प्रपोज’ केलं, त्यानंतर त्यांचं लग्न ठरल्याची घोषणा अंबानी कुटुंबीयांतर्फे करण्यात आली असं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे. पिरामल आणि अंबानी कुटुंबीयांचे संबंध गेल्या चार दशकांचे आहेत. इशा आणि आनंद यांची गेल्या अनेक वर्षांपासून मैत्री असल्याचं अंबांनी कुटुंबीयांनी कार्यक्रमावेळी म्हटल होत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिचं लग्न पिरामल समूहाचे प्रमुख अजय पिरामल यांचे पुत्र आनंद पिरामल याच्यासोबत विवाह झाला. तेव्हा देशातल्या सर्व प्रमुख माध्यमांमध्ये ही बातमी झळकली होती. तेव्हापासून सर्वांनाच आनंद पिरामल कोण आहेत याची उत्सुकता लागली. पण तुम्हाला माहिती आहे का की खरंच आनंद पिरामल कोण आहेत? त्यांच्याकडे स्वतः च्या मालकिची मालमत्ता किती आहे?\आपण लग्नाबद्दल बोललो तर त्यांचे लग्न अतिशय शानदार पद्धतीने झाले होते, केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील बडे सेलिब्रिटीही त्यांच्या लग्नात सहभागी झाले होते. ईशा अंबानीचे पती पिरामल कुटुंबाचे वारस आनंद पिरामल यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. अजय पिरामल हे पिरामल ग्रुप आणि श्रीराम ग्रुपचे चेअरमन आहेत, रिपोर्ट्सनुसार, अजय पिरामलची एकूण संपत्ती $4.5 मिलियन आहे.
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल लग्नाआधीही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी आपले नाते सर्वांसमोर उघड केले, आनंदने निशाला प्रपोज केले. ईशाच्या कुटुंबीयांनी आनंद आणि त्यांच्या नात्यासाठी सहमती दर्शवली.आनंदबद्दल सांगायचे तर, आनंद त्याच्या वडिलांच्या कंपनीत कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहे. श्रीराम समूहाचे अध्यक्ष आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेज शेअर करताना दिसले आहेत. पिरामल ग्रुप फार्मा हेल्थकेअर आणि फायनान्स सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. आनंद व्यतिरिक्त अजय पिरामल यांची मुलगी नंदिनी देखील आहे जी कंपनीत सदस्य आहेत.
दरम्यान, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं नवीन घर खूपच सुंदर आहे. साऊथ मुंबईच्या वरळीमध्ये असणारं हे घर सध्या चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. ‘गुलीटा’ असं या बंगल्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. ईशाचा हा सी फेसिंग बंगला तिच्या सासऱ्यांनी २०१२ मध्ये खरेदी केला होता. ईशाच्या लग्नाआधीच या बंगल्याचे काम सुरु होते.