बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये स्वतःला सुंदर भासवण्यासाठी अनेक अभिनेत्रींना मेकअपचा सहारा घ्यावा लागतो. याचप्रकारे आपण बॉलीवूडच्या अॅक्टर्सच्या पत्नींना देखील बहुधा मेकअपमध्येच पाहिले असेल.
परंतु क्वचितच आपण या चंदेरी दुनियेतील कलाकारांना मेकअपशिवाय पाहिले असेल. चला तर जाणून घेऊया या लेखामधून दिग्गज अभिनेत्यांच्या पत्नी बिना मेकअप कशा दिसतात. जे पाहून तुम्ही देखील म्हणाल कि हा सर्व मेकअपचा कमाल आहे.
गौरी खान :- बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानची पत्नी एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही. गौरीने किंग खानसोबत बॉलीवूडमधील डेब्यूच्या अगोदरच लग्न केले होते.
लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच यांचा चित्रपट दिवाना १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याला दर्शकांनी खूप जास्त पसंती दिली होती. मात्र गौरी बॉलीवूडमध्ये नसली तरी बिजनेसमध्ये आपले नाव कमवत आहे.
ट्विंकल खन्ना :- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार म्हणजेच अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु ट्विंकल खन्ना मोठ्या पडद्यावर काही खास कमाल दाखवू शकली नाही.
अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला बराच काळ डेट केल्यानंतर २००१ मध्ये तिच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर ट्विंकल खन्ना चित्रपटांपासून दूर गेली. मात्र ट्विंकल आतासुद्धा कोणत्याही अॅवॉर्ड शोमध्ये अक्षय सोबत पाहायला मिळते.
मान्यता दत्त :- या लिस्टमध्ये आणखी एक नाव येते ते म्हणजे संजय दत्तची तिसरी पत्नी मान्यता दत्तचे. जिने संजय दत्तसोबत हिंदू रीति-रिवाजांनुसार २००८ मध्ये लग्न केले होते.
तथापि मान्यातासुद्धा काही चित्रपटांमध्ये अभिनय करताना पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये ती मेकअप केल्यानंतर खूपच सुंदर दिसते. परंतु बिना मेकअप मान्यताला ओळखणे खूपच कठीण आहे.
किरण राव :- बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टची पत्नी किरण राव दिसायला बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. किरण राव अमीर खानची तिसरी पत्नी आहे. अमीर खानने किरण रावसोबत २००५ मध्ये लग्न केले होते. सध्या त्यांना एक मुलगा देखील आहे. किरण बॉलीवूडच्या अनेक चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे.