सलग दोन चित्रपट दिल्यानंतर सारा अली खान बॉलीवूडची पुढील सेंसेशन बनली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेला केदारनाथ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.
त्यानंतर २८ डिसेंबरला साराचा सिंबा चित्रपट प्रदर्शित झाला आणि काही महिन्यातच या चित्रपटाने ३०० करोडचा आकडा पार केला. सिंबा चित्रपटाचा डायरेक्टर रोहित शेट्टी आणि प्रोड्यूसर करण जौहर आहे.
चित्रपटामध्ये सारा आली खानच्या सोबत रणवीर सिंह सुद्धा पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या कि सारा आपली आई अमृताला सोडून वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आपली आई अमृता आणि पिता सैफच्या नात्यांबद्दल अनेक खुलासे करत आहे. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान साराने पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांची आठवण काढताना सांगितले कि त्यांना शेवटचे मी पाच वर्षांपूर्वी एकत्र पाहिले होते.
हे सांगताना सारा खूप भाऊक झाली. काय म्हणाली सारा पुढे जाणून घेऊया.
५ वर्षांपूर्वी झाली होती सैफ आणि अमृताची भेट :- सारा म्हणाली कि सैफ आणि अमृता यांची शेवटची भेट पाच वर्षांपूर्वी झाली होती. घटस्फोट घेतल्यानंतर गेल्या १५ वर्षांपासून सैफ आणि अमृता वेगळे राहत आहेत. वेगळे झाल्यानंतर दोन्ही मुलांचे संगोपन अमृताने एकट्यानेच केले.
एका मुलाखतीदरम्यान जेव्हा साराला तिच्या पेरेंट्सच्या नात्याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, जेव्हा पापा मला कोलंबिया विद्यापीठात सोडण्यासाठी आले होते त्यावेळी आईसुद्धा माझ्यासोबत होती.
आम्ही सर्वांनी मिळून डिनर केले. तो काळ खूपच चांगला होता. मला माझे पेरेंट्स कॉलेजला सोडण्यासाठी आले होते. सारा पुढे म्हणाली कि, ते मला कॉलेजमध्ये सोडून निघून घेले.
मला थोडेथोडे आठवते कि त्या रात्री माझी आई माझे अंथरून ठीक करत होती आणि पापा लैंप चा बल्ब लावत होते. या अस्पष्ट आणि सुंदर आठवणीला मी नेहमीच माझ्या मनामध्ये सांभाळून ठेवणार आहे.
साराने सोडले आई अमृताचे घर :- अलीकडेच सारा आई अमृताचे घर सोडून जाताना पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या घराचे सामान कार मध्ये ठेवताना पाहायला मिळाली होती.
अशामध्ये असा अंदाज लावला जात आहे कि आईशी असलेल्या मतभेदांमुळे साराने घर सोडले आहे. जेव्हा याबद्दल साराला विचारण्यात आले त्यावेळी तिने सांगितले कि तीला इतर स्टारकिड्ससारखे इंडिपेंडेंट व्हायचे आहे.
यासाठी तिने घरापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर बी-टाउनमध्ये आजकाल पेरेंट्सचे घर सोडून वेगळे राहण्याची फॅशनच बनली आहे. त्यामुळे साराने देखील या ट्रेंडचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आहे.