बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या सर्वांना माहिती आहे. एक काळ राणी मुखर्जी ने आपल्या अभिनयाने गाजवला होता. तिने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम देखील केलेले आहे आणि सगळे चित्रपट प्रसिद्ध देखील यशस्वी झाले होते.
आज ही राणी मुखर्जीचे अनेक चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. सगळ्यांची हृदयाची धक धक म्हणून देखील राणी मुखर्जी प्रसिद्ध होती. अनेक अभिनेत्यांसोबत सहकारी म्हणून देखील राणी मुखर्जीने काम केलेले आहेत.
जसे की नायक, मेहंदी, राजा की आयेगी, बरात मर्दानी अशा विविध चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपट आपल्या समोर राणी मुखर्जी घेऊन आली. आज आम्ही तुम्हाला राणी मुखर्जी बद्दल जास्त माहिती न सांगता तिच्या मुलीबद्दल सांगणार आहोत…
लग्न झाल्यानंतर देखील राणी मुखर्जीने बॉलीवूड क्षेत्र सोडले नाही. या क्षेत्रामध्ये राहून ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चाहता वर्गाचे मनोरंजन करत आहे. पूर्वीसारखे चित्रपटांमध्ये जास्त काम करत नसले तरी मध्ये काही वेब सिरीज, शॉर्ट फिल्म व चित्रपटाच्या माध्यमातून देखील ती प्रेक्षकांसमोर येत आहेत.
नुकतच सोशल मीडियावर राणी मुखर्जीची मुलगी अदिराचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सगळ्यांनी आश्चर्य देखील व्यक्त केले आहे. तसे पाहायला गेले तर राणी मुखर्जी सोशल मीडियापासून लांबच राहते.
तिने आतापर्यंत आपले व आपल्या कुटुंबीयांचे फोटो जास्त प्रमाणात शेअर केले नाही. तिला जास्त लाईम लाईट मध्ये देखील यायला आवडत नाही. परंतु तिच्या कामामुळे ती नेहमी प्रसिद्ध असते. राणी मुखर्जी ने आतापर्यंत वेगवेगळ्या सहकलाकारांसोबत काम केलेले आहे.
तिच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास ही अशी एक अभिनेत्री आहे. जिने आतापर्यंत कोणताही चित्रपटांमध्ये चुकीचे कार्य केले नाही. तसेच तिने आतापर्यंत ज्या ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेले आहेत त्या सर्व चित्रपटांनी यशाचे शिखर गाठले.
नव्वदच्या दशकामध्ये “राजा की आयेगी बरात” या चित्रपटाच्या माध्यमातून राणीने बॉलीवूड क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर राणीच्या अभिनयाचे कौतुक मोठ्या प्रमाणात झाले होते. या चित्रपटाच्या नंतर राणीला कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. एकापेक्षा एक चित्रपट तिच्या पदरी पडले.
राणी मुखर्जी ने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये शाहरुख खान, गोविंदा, आमिर खान, सलमान, अमिताभ बच्चन यासारख्या मोठ्या दिग्गजांसोबत काम केले आहे. चित्रपटामध्ये यश प्राप्त केल्यानंतर राणी मुखर्जी ने लग्न केले. राणी मुखर्जी ने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यश चोपडा यांचे पुत्र आदित्य चोपडा सोबत लग्न केले.
या दोघांनी 2014 मध्ये आपल्या लग्नाची एक प्रायव्हेट सेरेमनी देखील इटली मध्ये ठेवली होती. वर्ष 2015 मध्ये राणी आणि आदित्य यांना कन्यारत्न झाले आणि या मुलीचे नाव त्यांनी अदिरा ठेवले. नुकतेच राणी मुखर्जी ने आपल्या मुलीचा फोटो शेअर केलेला आहे.
तो अत्यंत सुंदर आहे. या फोटोमध्ये तिची मुलगी अतिशय गोंडस दिसत आहे. जेव्हा अदिराचा जन्म झाला होता तेव्हा देखील राणी मुखर्जीने तिचा फोटो शेअर केला नव्हता परंतु आता केले आहे माध्यमांच्या अहवालानुसार अदिराचे वय सहा वर्ष असावे.