आलिया भट्ट ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेचा विषय बनलेली असते. बॉलिवूडची गंगूबाई म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच अभिनेता रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले आहे. तेव्हापासून त्यांचे लग्न कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत असते. मात्र यावेळी त्यांची सून आलिया भट्ट हिच्यामुळे कपूर कुटुंबात खूशखबर आलेली आहे.
वास्तविकमध्ये, 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टने हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच इन्स्टाग्रामवर विदेशी सुपरस्टार्सना मात दिलेला आहे. अवघ्या 10 वर्षात आलिया टॉप 5 सेलिब्रिटी इन्फ्लुएंसर्सच्या यादीत सामील झालेली आहे.
आलिया भट्टने जेनिफर लोपेझसारख्या हॉलिवूड स्टारलाही मागे टाकले आहे, अशी माहिती मिळाली आहे. या यादीत आलिया ही एकमेव भारतीय अभिनेत्री नाही तर ती एकमेव आशियाई अभिनेत्री आहे. आलिया भट्टने लग्नाच्या 12 दिवसांत ही कामगिरी केल्याने तिचे सासरचे लोकही खूप खूश होत आहेत.
टॉप 5 सेलिब्रिटींच्या यादीत आलिया भट्ट चौथ्या स्थानावर आलेली आहे. अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका झेंडाया पहिल्या स्थानावर, डोम हॉलंडचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे, तर तिसऱ्या स्थानावर ऑस्कर स्लॅप प्रकरणानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता विल स्मिथचे नाव आहे. अभिनेत्री जेनिफर लोपेझ पाचव्या स्थानावर आहे. तर त्यात आलिया भट्ट एक पायरीवर आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट केवळ पडद्यावरच सक्रिय नसून तर ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकताच हा रिपोर्ट मीडियामध्ये व्हायरल झालेला होता. ज्यामध्ये तिने रणवीर कपूरलाही तिच्या विजयाचे श्रेय दिले आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मात्र, यादरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या महिन्याच्या १४ तारखेला दोघांचे लग्न झाले आहे. याच दरम्यान, जगातील टॉप 5 कलाकारांमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी आलिया भट्ट लग्नानंतर कामावर परतली आहे.
ती लवकरच पती रणवीर सिंगसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आलिया भट्टचे इंस्टाग्रामवर 64 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.