शाहरुख आणि सलमान पुन्हा आले एकत्र, कॅमेर्याने टिपले सुंदर क्षण; दोघांची जोडी पाहून चहाते झाले धन्य शाहरुख खान आणि सलमान खान बॉलीवूड इंडस्ट्री मधील दोन महत्त्वाचे अभिनेते आहेत. या दोघांच्या प्रत्येक हालचालीकडे माध्यमांचे बारीक लक्ष असते.
दोघांच्या चित्रपटांची उत्सुकता देखील या दोघांच्या चाहत्या वर्गाला मोठ्या प्रमाणावर असते. नुकतेच नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर से उद्घाटन झाले. हे उद्घाटन वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये होते. या कार्यक्रमाला अख्खा बॉलीवूड आलेला होता आणि तिथे वेगवेगळे सेलिब्रिटी आणि त्यांच्या भेटी घाटी आवर्जून झाल्या.
हे सर्व घडत असतानाच सलमान आणि शाहरुख खान हे दोघे ही एकमेकांना भेटले आणि नेमका हाच क्षण कॅमेऱ्याने कैद केला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. या व्हिडिओला लोक लाईक देखील करत आहेत. खूप वर्षानंतर या दोघांना एकत्रितरीचा कॅमेरा मध्ये पाहिल्याने चाहता वर्ग खुश झालेला आहे.
शुक्रवारच्या रात्री बॉलीवूड हे एकत्रितरित्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळाले, यामागील कारण देखील अत्यंत महत्त्वाचे होते. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर चे उद्घाटन करण्यासाठी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते आणि म्हणूनच शुक्रवारचे रात्र “एक हसीन रात” म्हणून ओळखली गेली. या रात्री अनेक सेलिब्रिटी एकमेकांना भेटले. नवीन जुन्या आठवणी ताज्या झाल्या. एकंदरीत या कार्यक्रमाला स्नेह मीलनाचे प्राप्त झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेल वेंचेस लिमिटेड संचालक ईशा अंबानी यांनी केले होते. या कार्यक्रमातील अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर हल्ली व्हायरल होत आहेत. या वायरल झालेल्या फोटोज आणि व्हिडिओमध्ये आपल्याला शाहरुख खान आणि सलमान खान यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहेत. हे दोघेजण आपल्या कुटुंबीयांसोबत वेगवेगळे पोस्ट देखील देताना दिसत आहेत.
या कार्यक्रमाचे सारे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भैयानी ने शेअर केलेले आहेत. त्या कार्यक्रमाचे वेगवेगळे सुंदर फोटोज पाहून तुम्ही देखील सारे सेलिब्रिटी वेगवेगळ्या कपड्यांनी झगमगत्या विश्वात वावरताना तुम्हाला दिसतील, त्यापैकी गौरी, सुहाना आणि आर्यन सोबत सलमान खानचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर वायरल झालेला आहे.
हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर या व्हिडिओमध्ये गौरी खान आपल्या मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारे पोज देत आहे आणि त्यानंतर सलमान आणि शाहरुख खान दोघे एकत्र येऊन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देखील देत आहेत, अशा प्रकारचे एकंदरीत चित्र पाहायला मिळाले…
या व्हिडिओला सलमान आणि शाहरुख खान चे चाहते भरभरून प्रेम देत आहे. अनेकांनी या दोघांचे कौतुक देखील केले तसेच अनेकांनी या दोघांना नक्की चित्रपटांमध्ये एकत्रित या पाहायला आवडेल, अशा विविध प्रकारच्या कमेंट देखील केले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा सोशल मीडियावर अवश्य पहा…
View this post on Instagram