बॉलिवूड अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अनेक अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात आणि चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवतात. त्यातही एखाद्या अभिनेत्रीचं आई होणं हा आनंदाचा क्षण तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असतो.
अभिनेत्री बिपाशा बासू ही देखील याच कारणानं सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या पतीसोबत रोमँ’टिक पोज देताना तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. बिपाशा बासूचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई होणार असून ती पहिल्यांदा बाळाला जन्म देणार आहे. बिपाशाने आपल्या अदाकारीने यापूर्वीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि सध्या ती आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. बिपाशा गेली सहा वर्षे या सुंदर क्षणाची वाट पाहत होती.
लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आणि बिपाशाने चाहत्यांसाठी एक गुड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री बिपाशा विषयीची ही बातमी ऐकून तीचा पती देखील खूप आनंदी झाला. बिपाशाने १६ ऑगस्ट रोजी तिच्या पतीसह तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेग्नेंसीवर आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना बिपाशा म्हणाली की, तिने ही आनंदाची बातमी पहिल्यांदा शेअर केली आहे.यासोबतच अभिनेत्री बिपाशाने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. बिपाशाने लिहिले, ‘एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा… नवीन प्रकाशाने आमच्या आयुष्यात एक नवीन छटा जोडली आहे. हे आम्हाला नेहमीपेक्षा अधिक पूर्ण करत आहे.
आम्ही आमचं आयुष्य वेगळं सुरू केलं, मग आम्ही भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. हे दोन लोकांसाठी फक्त खूप प्रेम आहे, जे थोडेसे बिनधास्त वाटते. याशिवाय बिपाशाने तिच्या सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. दरम्यान, अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर २०१६ मध्ये विवाह बं’धनात अडकले.
दोघांच्या लग्नाला आता ७ वर्षे पूर्ण झाली असून ७ वर्षांनंतर दोघांच्याही घरात चिमुकली पावलं पडणार आहेत. करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू यांच्यातील ही प्रेमकहाणी ‘अलोन’ चित्रपटाच्या वेळेपासून सुरू झाली आणि नंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे दोघे बॉलीवूडमधील सर्वात चांगले आणि आवडते जोडपे आहेत.