प्रेम करणं जितकं सोपं आहे तितकंच ते निभावणं कठीण असतं असं बोललं जातं. यामध्ये तथ्य देखील आहे. जेव्हा तुम्ही नात्यामध्ये येता तेव्हा जोडीदाराने आपला आदर, सन्मान करावा, आपल्याला समजून घ्यावं अशी तुमची अपेक्षा असते. खरं तर नात्यामध्ये दोन व्यक्तींनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त एकच व्यक्ती नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते नातं अधिक काळ टिकून राहत नाही.
तसेच नात्यामध्ये जेव्हा मुलींबाबत बोललं जातं तेव्हा अधिक त्याग हा महिला जोडीदारालाच करावा लागतो. लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरचं नातं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा जोडीदार तुम्हाला त्याच्याबरोबरीनेच समान वागणूक देतो. असंच काहीसं विदेशी बहु प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra) बाबतीत देखील घडलं.
प्रियंका चोप्रा तिच्या दमदार अभिनयामुळे सातासमुद्रापलिकडे पोहोचली. पण तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील ती चर्चेचा विषय ठरली. प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) 2018 साली अमेरिकन पॉप सिंगर निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्नबेडीत अडकली. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या 3 वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे.
इंडस्ट्रीमधील बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही निक जोनस यासोबत लग्न झाल्यापासून तर खूप जास्त चर्चेत असते. तसे पाहता तिची व निक ची केमिस्ट्री देखील अतिशय भन्नाट जुळते. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस ही एक आयकॉनिक फेम बनली आहे. हिने इंटरनॅशनल लेवल वर स्वतःची अशी एक विशिष्ट जागा बनवली आहे, ज्यामुळे ती खूप प्रसिद्धीत असते.
प्रियांका चोप्रा परदेशात आपल्या कुटुंबासोबत शांततेत आयुष्य जगत आहे. परदेशात राहून प्रियांका भारताच्या मातीशी जोडली गेली आहे आणि याचा पुरावा ती अनेकदा देत असते. दरम्यान, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिच देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनासच्या आईला म्हणजेच तिच्या सासूला तिच्या नावाने हाक मारते. तुमचा विश्वास बसत नसेल तर प्रियांकाची ही पोस्ट तुम्ही नक्कीच पहा, जी तिने सासूच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली आहे.
प्रियंका चोप्राने तिच्या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक अतिशय सुंदर पोस्ट केली आहे. प्रियांकाने तिच्या सासूसोबतचा स्वतःचा एक लेटेस्ट सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही कॅमेऱ्यासमोर स्माईल देताना दिसत आहेत.
सासू डेनिस मिलर जोनास यांच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले – “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिली. तुमच्यावर खूप प्रेम आहे. Love You So Much. तुम्ही आमच्या आयुष्यात आहात हाच आमच्यासाठी आशिर्वाद आहे. तुम्हाला आजच्या दिवशी खूप प्रेम आणि आनंद मिळो.”, अशी पोस्ट लिहित सासूबाईंना खास शुभेच्छा दिल्या आहेत
दरम्यान, प्रियांकाने तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्यासाठी देखील तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. प्रियांका म्हणते, “सिद्धू तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. Love U So Much. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे”, अशी पोस्ट तिने भावासाठी लिहित त्यालाही वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाचा भाऊ हा शेफ असल्याचे देखील तिने सांगितले आहे.