“मेगा आयकॉन्स” नावाच्या मालिकेत नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने दीपिकाच्या जीवनाबद्दल सांगितले होते. दिपिकाने तिचा भावनिक प्रवास, नै-राश्यातून कसा शेअर केला. तिचे जीवन आणि तिचे चांगले आणि वाईट टप्पे याबद्दल या शोमध्ये माहिती मिळते.
याबरोबरच बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी तिच्याबद्दल तसेच तिचा पती रणवीर सिंगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलले. इम्तियाज अली असे म्हणतात की ती एक हुशार अभिनेत्री आहे. पण तिच्यात आत्मविश्वास कमी आहे. आणि तिला खूप भीती वाटते पण तिच्या चित्रपटांमुळे ती आज बॉलिवूडची सर्वात मोठी अभिनेत्री आहे.
दीपिकाचे आयुष्य बर्याच अडचणींत अडकलेले होते. आणि रणवीरने तिला नै-राश्यातून मुक्त होण्यासाठी खूप मदत केली होती. आणि यामुळे दोघेही अगदी जवळ आले होते. ते या शोमध्ये या बद्दल बोलत होते. दीपिका कशी पूर्णपणे नै ऱ्याश्यात बुडली होती आणि ती या सर्वांमधून कशी बाहेर पडली याविषयी ते बोलतात.
दीपिका चे वडील एक सुप्रसिद्ध टेनिसपटू प्रकाश पादुकोण आहे. तिच्या वडिलांची इच्छा होती कि त्यांच्यासारखाच तिने एक टेनिस प्लेयर बनाव आणि दीपिकापण टेनिस मध्ये चांगली खेळाडू होती. पण तिने तिचे करियर वेगळे निवडले आणि बोललीवूडची सर्वात मोठी अभिनेत्री बनली.
तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच आपल्या पतीसोबत ८३ चित्रपटात दिसणार आहे जी कपिल देवची बायोपिक आहे. आणि भारतासाठी १९८३चा वर्ल्डकप जिंकण्याची कथा आहे.