लव्ह स्टोरी, प्रेम प्रकरण असले तर काहीतरी हंगामा होतोच, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आतापर्यंत आपण अनेकदा चित्रपटांमध्ये बघितले असेल की,जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांना वि’रो’ध करणारे अनेक वि’लन त्यांच्या आजूबाजूला असतात.
अनेकदा घरच्यांच्या वि’रोधा’त जाऊन ही मंडळी लग्न देखील करतात, अशावेळी लग्नात सतराशे साठ विघ्न निर्माण होतात. अनेकदा तर प्रियकर आणि प्रियसी यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागते किंवा एकमेकांवर जीव देखील ओवाळून टाकावा लागतो.
असे अनेक प्रकारचे दृश्य आपण चित्रपटांमध्ये पाहिले आहे परंतु प्रत्यक्ष खरोखर जीवना मध्ये असे घडलेलं क्वचित पाहायला मिळते. आम्ही तुम्हाला अशी एक लव स्टोरी सांगणार आहोत ज्या लव स्टोरी मध्ये असे घडले की प्रत्यक्ष लग्नामध्ये गोळीबार झालेला आहे.
तुम्हाला वाचून नवल वाटेल परंतु ही घटना एका लग्नविवाहामध्ये घडलेली आहे. आपल्या सर्वांना क्रिकेटर रवींद्र जडेजा माहितीच आहे. रवींद्र जडेजा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवतो तेव्हा त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग ने सगळेजण थक्क होऊन जातात.
खेळापुढे रवींद्र जडेजाला सगळ्या गोष्टी शूल्लक वाटतात, हे अनेकदा आपण पाहिले देखील आहे. क्रिकेट खेळत असताना त्याच्या अंगी असलेली आक्रमकता आपल्याला अनेकदा दिसून येते. हीच आक्रमकता व्यक्तिगत जीवनामध्ये देखील रवींद्र जडेजा कायम ठेवत असतो.
एखाद्या व्यक्तीला प्रतिउत्तर करण्या साठी देखील रवींद्र मागेपुढे पाहत नाही. हीच आक्रमकता त्याने त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील कायमस्वरूपी ठेवलेली आहे. त्याच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळी हवेत गो’ळीबा’र करण्यात आला होता. अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे पोलीस स्टे’श’नमध्ये त’क्रा’र देखील करण्यात आली होती.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रवींद्र जडेजा याची एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजपूत घराण्याची आहे. राजपूत घराण्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लग्न लागते. तेव्हा हवेमध्ये गोळीबार करण्याचे कृत्य केले जाते. ही एक परंपरा देखील मानली जाते.
हीच वि’धी व परंपरा पार पाडत असताना हवेमध्ये गोळीबार करण्यात आला होता. रवींद्र जडेजाच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे लग्न रीवाबा सोलंकी सोबत झाले. या दोघांचे लग्न म्हणजे अरेंज कम लव स्टोरी म्हटले जाते. यामागील देखील एक कथा आहे. रवींद्र च्या मागे घरातील मंडळी लग्न करण्यास मागे लागले होते.
परंतु रवींद्रला खेळाच्या पुढे काही दिसत नव्हते आणि म्हणूनच अशा वेळेत घरच्यांनी त्याच्या लग्नाचा विषय पुढे नेला आणि ओळखीच्या नातेवाईकांमध्ये रवींद्र साठी मुली शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. रवींद्र च्या बहिणीने रवींद्र आणि रीवाबा या दोघांची ओळख एका पार्टीमध्ये केली होती.
रीवाबाला पाहताच रवींद्र अगदी तिच्यावर फिदा झाला होता. या पार्टीमध्ये दोघांच्या नंबराची अदलाबदल झाली आणि त्यानंतर तुम्हा सर्वांना माहितीच आहे काय घडले. या सर्वांची बोलणी थेट लग्नापर्यंत पोहोचली. दोघांची भेट झाल्यानंतर तीन महिन्याच्या आतच यांचा साखरपुडा उरकला.
त्यानंतर या दोघांनी लवकर आपल्याला लग्नाची गाठ देखील बां’धली. लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच यांना कन्यारत्न झाले. या कन्याच नाव आहे निध्याना. रवींद्र आणि रीवाबा दोघेही आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात.