आज इथे तरी असं कोणी नसेल जे सचिन खेडेकर यांना ओळखत नसेल. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपला चित्रच लोकांच्या मनामध्ये अशाप्रकारे बिंबवलंय कि, त्यांना समोर बघताच लहान लहान मूल सुद्धा त्यांना ओळखतात.
सचिन खेडेकर यांना मराठी चित्रपट सृष्टीत एक महान कलाकार म्हणून पाहिले जाते आणि हिंदी चित्रपट निर्मितीतही एक उत्कृष्ट सूत्रसंचालक व तितकेच चांगले व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहेत.
तुमच्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि, सचिन खेडेकर यांचा जन्म १4 मे 1965 रोजी मुंबई येथे झाला. तसेच वांद्रे, मुंबई येथील टीएसईसी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांना त्यांचे शिक्षण घेतले.
त्यांनी सुरुवातीला काही काळ एका खासगी कंपनीत काम सुद्धा केलेले आहेत. ते सांगतात मी माझे काम करत असताना थिएटरमध्ये नशीब आजमावले. रंगमंचावर एकनिष्ठ असल्यामुळे त्यांनी पूर्ण वेळ स्वत: ला त्यात वाहून घेतले.
नंतर त्याला मोठं मोठ्या भूमिका मिळायला लागल्या. आपल्या टीव्ही मालिका ‘सैलाब’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही त्याने जिंकला. ईटीव्ही मराठीवर आधारीत मिलियन हू एक मराठी करोडपती या मालिकेसाठी सचिनची निवड झाली. आणि सचिनने ते अगदी चांगले प्रकारे हाताळले.
एव्हढच नव्हे तर तुम्हाला सांगू इच्छितो कि, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.
सचिन खेडेकर यांनी 1949 मध्ये जलपा सोबत लग्न करून स्वतःला विवाह बंधनात अडकवून घेतले. सचिन खेडेकर आणि जलपा खेडेकर यांना दोन मुले आहेत.
सध्या सचिन खेडेकर हे मुंबईत रहातात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे त्यांना ‘झी गौरव’ पुरस्कारही देण्यात आला.
गोलमाल अगेन, रुस्तम, तेरे नाम, जिद्दी, जुडवा 2, कोंकणस्थ, राजवाडे अँड सन्स, काकस्पर्श , दशावतार, अग्निपथ विधिलिखित अशा खूप साऱ्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या आणि कौतुकास्पद पात्रांमध्ये दिसले आहेत.
केवळ चित्रपटच नाही तर टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी सगळीकडे आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले आहेत. सैलाब, इम्तिहान, थोडा है थोडे कि जरुरत है, अभिमान या हिंदी टीव्ही मालिकांमधूनही त्याच्या अभिनयाची सर्वांना पसंती मिळाली.
तसेच कवी गुलजार यांच्यावर, गुलजार, बात पाशमाने कि या कवींवर आधारित कविता सादर केल्या. इ टीव्ही वर कोण बनेगा करोडपती या हिंदी मालिकेवर आधारित कोण होईल मराठी करोडपती मालिकेत दिग्दर्शक म्हणून काम केले.
ते म्हणाले की माझ्या या सर्व सक्सेस ला मी माझ्या पत्नीला खूप श्रेय दिले होते, त्यामुळे आजचा हा सुवर्णदिन मला पहायला मिळतो.