बॉलीवूडमध्ये ज्या कलाकारांनी आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतिच्या बळावर प्रसिद्धी मिळवली आहे आज ते सुपरस्टार म्हणून बॉलीवूडमध्ये स्थापित झाले आहे, त्यांच्या फॅन्सची संख्या करोडोमध्ये आहे.
हे फॅन्स त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. त्यांची एक झलक मिळवण्यासाठी काही फॅन्स तासनतास वाट पाहत असतात. तर काही फॅन्सनी त्यांच्या वेडापाई मंदिरेसुद्धा बनवली आहेत.
इथे आम्ही सलमान खानच्या एका अशाच फॅनबद्दल सांगणार आहोत ज्याने सलमान खानच्या वेडापाई असे काही वेगळे करून दाखवले आहे.
इथून सुरु केला प्रवास
हि व्यक्ती सलमान खानची मोठी फॅन आहे. याने सलमान खानला भेटण्यासाठी तब्बल ६०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या व्यक्तीचे नाव भूपेन लिक्सन असे आहे. हा मुळचा आसाममधील तिनसुकिया मधील रहिवाशी आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार त्याने गेल्या ८ फेब्रुवारीला आपल्या होमटाउन तिनसुकिया पासून सायकलचा प्रवास सुरु केला होता. १३ फेब्रुवारीला तो गुवाहाटीला पोहोचला. भूपेन सध्या ५२ वर्षांचा आहे.
सलमान खान गुवाहाटीमध्ये फिल्म फेयर अवार्ड कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी जात आहे. हे माहिती कुठूनतरी भूपेन लिक्सनला मिळाली.
फक्त एवढे ऐकताच त्याने निश्चय केला कि गुवाहाटीला जाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये सलमान खानला भेटायचेच. यानंतर त्याने सायकल घेतली आणि सायकलवरून गुवाहाटीला पोहोचून सलमान खानला भेटण्याचा निश्चय केला.
याबद्दल न्यूज़ एजेंसी एएनआई कडून सुद्धा एक ट्वीट करून या गोष्टीची पुष्टी केली आहे. यामध्ये भूपेनकडून असे लिहिण्यात आले आहे कि त्याला माहित झाले कि, सलमान खान फिल्म फेयर अवार्ड समारोहामध्ये भाग घेण्यासाठी गुवाहाटीला येत आहे.
यामुळे त्याने ८ फेब्रुवारी रोजी तिनसुकियापासून आपली सायकल यात्रा सुरु केली. गुवाहाटीमध्ये त्याला सलमान खानला भेटायची इच्छा आहे.
भूपेनची आपला आवडता अभिनेता सलमान खानसोबत भेट झाली आहे का नाही याबद्दल अजून काही बातमी समोर आलेली नाही. तथापि भूपेन लिक्सन ज्याप्रकारे सायकलने ६०० किलोमीटर प्रवास करून सलमान खानला भेटण्यासाठी गुवाहाटीला पोहोचला.
यामुळे त्याचे नाव सलमान खानच्या खास फॅन्सच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. तरीही भूपेन लिक्सनला शुभेच्छा देऊया कि त्याची सलमान खानला भेण्याची इच्छा लवकरात लवकर जरून पूर्ण व्हावी.
सलमान खानच्या या ५२ वर्षीय जबरा फॅन भूपेन लिक्सनबद्दल आणखी एक रंजक गोष्ट समोर आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याचे नाव नोंदलेले आहे. कारण त्याने सायकलच्या हँडलला स्पर्श न करता सायकल चालवत ६० मिनिटामध्ये ४८ किलोमीटरचा प्रवास केला होता. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याचे नाव नोंदले गेले आहे.