बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमी वेळात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर आतापर्यंत ती बर्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. चाहत्यांना तिचा अभिनय आणि नृत्य खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्रामवर तिचे 29 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करते. बॉलिवूडची होतकरू अभिनेत्री आणि सैफ अली खान- अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ही तरुणाईच्या गळ्यातली ताईत झाली आहे.
आतापर्यंत साराने फक्त दोनच सिनेमे केले असले तरी सोशल मीडियावर तिची क्रेझ अफलातून आहे. कॉफी विथ करणमध्ये जेव्हा साराने तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं म्हटलं तेव्हा अनेक तरुणांची हृदयही तुटली होती. पण या सगळ्यात फार कमी लोकांना माहीत आहे की, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी साराचं ब्रेकअप झालं होतं. अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अप्रतिम अभिनयाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर चाहत्यांच्या हृदयात आणि मनावरही एक मजबूत छाप पाडली आहे. खरं तर, सारा अशीच एक अभिनेत्री आहे जी अभिनयासोबतच तिच्या फॅशन, स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
प्रत्येक सेलिब्रिटीचं (Celebrity) खासगी आयु्ष्य जाणून घेण्याचा त्यांच्या चाहत्यांचा किंवा इतरांचा अधिक प्रयत्न असतो. त्यामुळे टिव्हीला असे काही कार्यक्रम (TV Show) आहेत. तिथं त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. सारा अली खान सध्या अविवाहित असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु तिचे नाव वेळोवेळी अनेक स्टार्सशी जोडले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया सारा अली खानच्या सर्व अफेअर्सबद्द्ल…
ईशान खट्टर :- सारा अली खान एकेकाळी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला डेट करत होती, असे म्हटले जाते. कॉफी विथ करण या शोमध्ये ती ईशान खट्टरचा संदर्भ देत होती जेव्हा ती म्हणाला की मी दोन चित्रपट भावांपैकी एकाला डेट केले आहे. सारा अली खान आणि ईशान खट्टर एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले.
हर्षवर्धन कपू :- हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खान डेट करत असल्याच्या बातम्याही कोणापासून लपून राहिलेल्या नाहीत. हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खानच्या सोशल मीडियावरील फोटोंनी अनेकवेळा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण दोघांचे ब्रेकअपचे कारण काय होते हे अद्याप समजू शकलेले नाही.माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री सारा अली खाननेही एका राजकारण्याच्या नातवाला डेट केले आहे. खरे तर ते सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया होते. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र ब्रेकअपनंतर अभिनेत्री सारा अली खानने ते फोटोही डिलीट केले.
कार्तिक आर्यन :- सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली जोडी आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा कार्तिक आर्यनवर क्रश होता आणि ते एकमेकांना डेट करत असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पण हे नाते फार काळ टिकले नाही. लव्ह आज कल 2 रिलीज झाल्यानंतर दोघे वेगळे झाले.