मित्रांनो ,अभिनेता सतीश कौशिक आपल्या सर्वांचे परिचयाचे होते. एखाद्या क्वचितच व्यक्ती असा असेल की ज्यांना सतीश कौशिक माहिती नसेल. सतीश कौशिक यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका देखील केल्या होत्या. त्यांच्या अनेक भूमिका प्रचंड प्रमाणात गाजल्या.
चित्रपट क्षेत्रांमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना “कॅलेंडर”भूमिका असलेले हे पात्र मिळाले होते आणि या पात्रामुळे त्यांना आगळी वेगळी ओळख देखील प्राप्त झाली. कालांतराने अभिनेता सतीश कौशिक आणि कॅलेंडर नाव हे एक नवीन समीकरणच बनले.
त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सतीश यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि निखळ विनोदाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले.
जसे ते बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीवनामध्ये देखील त्यांनी अनेक अशा काही गोष्टी केल्या होत्या ज्यामुळे त्यांना एकेकाळी प्रसिद्धी मिळाली होती. बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांची उपस्थिती प्रमुख मानली होती परंतु त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी केलेली एक घटना त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील आगळे वेगळी मानली गेली होती.
तरुणपणी अभिनेता सतीश कौशिक खूपच सक्रिय होते. त्यांच्या मध्ये असलेली ऊर्जा प्रचंड प्रमाणात सर्वांना प्रोत्साहन देणारी होती. कॉलेजमध्ये असताना देखील त्यांनी एकेकाळी कॉलेज गाजवले होते आणि त्यानंतर जेव्हा लग्न केले तेव्हा देखील त्यांच्या कुटुंबीयांना हैराण करून सोडले होते, अशी ही त्यांची आगळीवेगळी जीवनशैली खूपच महत्त्वपूर्ण ठरते.
सतीश कौशिक यांनी 1985 मध्ये शशी कौशिक यांच्यासोबत आपल्या आयुष्याची गाठ बांधली परंतु कॉलेजमध्ये असताना त्यांचे मन शशी कौशिक नावाच्या मुलीवर आले होते त्यानंतर अभिनेता सतीश यांना तिच्यावर प्रेम झाले होते.
त्याकाळी ते अभिनेता नव्हते परंतु एक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना त्यांनी एकदा शशीला सांगितल्या देखील होत्या. सतीश यांचा स्वभाव इतका गोड आणि मनमिळावू होता की शशी देखील त्यांना नाकारू शकल्या नाही. लग्न करण्याआधी ते एकमेकांना भेटायचे त्यानंतर मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि 1985 मध्ये त्यांनी शुभ विवाह केला.
अशी देखील माहिती सांगितली जाते की शशी आणि सतीश हे दोघेजण पळून जाण्याचा विचार करत होते परंतु मित्रमंडळींच्या मदतीने तसेच घरच्यांच्या पुढाकाराने हे लग्न यशस्वी झाले, कारण जेव्हा या दोघांच्या घरी हे प्रकरण कळले होते तेव्हा त्या दोघांचे आई-वडील या लग्नाला तयार नव्हते. सतीश यांचे प्रेम म्हणजे शशी होते आणि शशी यांचे प्रेम हेच सतीश होते.
या दोघांनी आपल्या आई-वडिलांना या नात्यापुढे गुडघे टेकायला लावले. त्यांची लव स्टोरी त्याकाळी इतकी गाजली होती की पंच क्रोशित ही घटना पसरली होती. त्याकाळी या घटने मुळे गावामध्ये सतीश अनेकांसाठी आदर्श देखील ठरले. लग्न केल्यानंतर ते आजतायागत शशी यांनी कधीच सतीश यांची साथ सोडली नाही.
सतीश यांच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी पुढाकार घेतला. शशी यांनी सतीश यांच्या आई वडिलांना कधीच अंतर दिले नाही. आज अभिनेता सतीश जरी आपल्या सोबत नसले तरी यांच्या कुटुंबीयांमध्ये त्यांची पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि विनोदाच्या मदतीने इतरांचे संकट दूर करणारा हा अभिनेता सगळ्यांच्या लक्षात राहील यात मात्र शंका नाही!