बॉलिवूड मध्ये सध्या साऊथ इंडियन तेलगू चित्रपटांकडे जास्त बारकाईने पाहिले जाते. तसेच आपल्याला तर माहिती आहे कि, साऊथ इंडियन चित्रपट हिंदी मध्ये डब करून, हिंदी वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणावर दाखवले जात आहे.
त्यामुळे बॉलीवूड चे चाहते मोठ्या प्रमाणावर साऊथ इंडियन कलाकारांचे सुद्धा चाहते बनलेले दिसून येत आहे. अशाच आपल्या एका लाडक्या कलाकाराने नुकतीच एंगेजमेंट केलेली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप पसरले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.
तेलगू अभिनेता नितीन आणि शालिनी
तेलगू अभिनेता नितीनने गेल्या दिवसात आपली दीर्घ काळची मैत्रीण शालिनी रेड्डीशी एंगेजमेंट केली. दोघांचे एंगेजमेंट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व चित्रांमध्ये हे दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसून येत आहेत.
नितीन आणि शालिनीने आपल्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये एंगेजमेंट चा कार्यक्रम पार पाडला. नितीनने त्याचे एंगेजमेंट चे फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरही शेअर केलेले आहेत.
एंगेजमेंट मध्ये अशा प्रकारे होता त्याचा साज
नितीन या फोटोंमध्ये धोतीमध्ये दिसत आहे, तर शालिनी एका लेहेंगामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दोघेही सगाईचे विधी पूर्ण करताना अतिशय सुंदर दिसत होते.
सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंनी फार धुमाकूळ घातलेला आहे. सर्व जण त्यांच्या बद्दल पोस्ट टाकत आहे आणि त्यांना चहुबाजुकडुन शुभेच्छा मिळत आहेत. शालिनी यांनी यूके विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास पूर्ण केलेला आहेत. दोघेही जवळपास आठ वर्षांपासून एकमेकांना जवळून ओळखतात.
नितीन हा तेलगू चित्रपटांमधील एक प्रख्यात आणि नावाजलेला कलाकार आहे. नितीनने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आजही नितीन चे चित्रपट तितक्याच उत्सहात पहिले जातात. आणि सुपरहिट होतात.
नितीनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत जवळपास 50 चित्रपटांत काम केले आहे. 2002 पासून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. नितीन हे ‘श्रीनिवास कल्याणम’ आणि ‘चल मोहन रंगा’ सारख्या चित्रपटात चमकदार अभिनयासाठी ओळखले जातात.
तुम्हाला नितीन आणि शालिनी ची जोडी कशी वाटली आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.