सावत्र आईवर खूपच प्रेम करतात हे बॉलीवूडचे ४ कलाकार, एक तर करतो अतोनात प्रेम

Letest News

सध्या बॉलीवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना चालू आहे. स्टार किड्स आपले नाव आणि अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपली एक नवीन जागा बवण्यात बऱ्यापैकी सफल झाले आहेत.

होय स्टार किड्सचा बॉलीवूडमधील प्रवास हा अन्य किड्सच्यापेक्षा खूप सोपा असतो. कारण त्यांच्या नावासोबत स्टार किड्स लावले जाते, अशामध्ये त्यांना आपल्यासाठी काम शोधणे अवघड नाही जात, परंतु गोष्ट फक्त कामाचीच नसते तर त्याबरोबर कठोर मेहनत सुद्धा घ्यावी लागते.

असो, आज आम्ही बॉलीवूडच्या त्या कलाकारांच्याबद्दल सांगणार आहोत जे आपल्या सावत्र आईवर खूप प्रेम करतात. चला तर मग जाणून घेऊयात या लेखातून.

बॉलीवूडमध्ये अनेक सितारे आहेत, ज्यांनी दुसरे लग्न केले आहे आणि त्यांची मुले त्यांच्यापासून वेगळे राहतात. परंतु काही असे स्टार किड्स आहेत जे आपल्या सावत्र आईचा द्वेष करण्याचा विचारदेखील करत नाहीत तर त्यांच्यावर अतोनात प्रेम करतात. चला तर जाणून घेऊयात ते कोण-कोणते कलाकार आहेत.

शाहिद कपूर

बॉलीवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून पॉपुलर असलेला अभिनेता शाहिद कपूरचे करियर खूपच चांगले राहिले आहे. शाहिद कपूर ने आपले नाव आणि प्रसिद्धी खूप मिळवली आहे.

शाहिद कपूरचे पिता पंकज कपूरने दुसरे लग्न सुप्रिया पाठक सोबत केले होते, जिच्यावर शाहिद कपूर खूपच प्रेम करतो. शाहिद कपूरच्या आईचे नाव नीलिमा अजीम आहे.

सनी देओल

सनी देओलचे पिता धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील सदाबहार अभिनेता राहिले आहेत. धर्मेंद्रने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले आहेत आणि त्यांचा मुलगा सनी देओलने सुद्धा खूप नाव कमवले आहे.

धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले आहे, ज्यानंतर सनी सनी देओल हेमा मालिनी वर अतोनात प्रेम करतो आणि तो नेहमी आपल्या सावत्र आईसोबतच राहतो.

सारा आली खान

बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री सारा आली खानला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. सारा अली खान जेव्हापासून अभिनेत्री बनली आहे तेव्हापासून ती नेहमीच चर्चेमध्ये राहत असते.

सारा अली खानच्या आईचे नाव अमृता सिंह आहे, जिच्यावर तिचे खूप प्रेम आहे, परंतु पिता सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूरवर सुद्धा ती तितकेच प्रेम करते. म्हणजेच सारा अली खान आपल्या सावत्र आईचा तिरस्कार करत नाही.

सलमान खान

सलमान खानच्या इशाऱ्यावर तर संपूर्ण बॉलीवूड फिरत असते. याचा अर्थ असा आहे कि सलमान खान बॉलीवूडच्या बड्या कलाकारांपैकी एक आहे. सलमान खान भलेहि आज पर्यंत अविवाहित आहे परंतु त्याच्या वडिलांनी दोन लग्न केले आहेत.

सलमान खान आपले वडील यांची दुसरी पत्नी हेलनवर खूप प्रेम करतो आणि त्याने कधी आपली आई आणि सावत्र आई यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. तर तो दोघांचाहि पूर्ण सन्मान करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *