बॉलिवूड असो किंवा मग दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, सेलिब्रेटी म्हटलं की ग्लॅमर आणि फॅशन या गोष्टी आल्याच. हे कलाकार नेहमीच मुलाखत, चित्रपट प्रमोशन किंवा इतर कोणत्याही खास कार्यक्रमात इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी सर्वांपेक्षा वेगळी फॅशन करण्यावर भर देतात. यात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील आहे.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूरने मेहनतीच्या जोरावर बाॅलिवूड इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूर ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एक काळ असा होता की जान्हवीला सर्वजण श्रीदेवीची मुलगी म्हणून ओळखत होते, पण आता जान्हवी तिच्या नावामुळे आणि कामामुळे ओळखली जाते.
जान्हवीचे वडील बोनी कपूर जे चित्रपट पार्श्वभूमीचे आहेत, ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्याची आई बाॅलिवुडमधील सर्वात सुंदर नायिका होती. अगदी कमी वयातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. या गोष्टीच दुःख जान्हवीच्या मनात कायमच राहते. आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.
त्याच बरोबर यशाच्या शिडीवर चढताना आई- वडिलांनी नेहमी सोबत असावेत,अशीही मुलांना इच्छा असते. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला बाॅलिवुडमध्ये पदार्पण करायचे होते. जान्हवीने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या त्या भुमिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करु लागले.
परंतु, जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ रीलीज होण्यापूर्वीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. आईच्या जाण्याने जान्हवीने धीर सोडला नाही. तर तिने कठोर परिश्रम केले आणि आज तिची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते. जान्हवी कपूर ही अशीच एक अभिनेत्री आहे जी नेहमी तरुणांमध्ये खुप प्रसिद्ध आहे.
जान्हवी असा ब्रॅंड आहे जो प्रत्येकजण फॉलो करतो. सोशल मीडियावर जान्हवीचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहेत. जान्हवी ही बॉलिवूड कपूरच्या नव्या पिढीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोचे तरुणांमध्ये एक वेगळे आकर्षण आहे. जान्हवी तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.
हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्याच्या प्रमोशनसाठी जान्हवी सध्या डान्स रियालिटी शो डीआयडी सुपर मॉम्सच्या सेटवर पोहोचली होती. जिथे तिचा हॅट लूक पाहायला मिळाला. जान्हवीने डीप नेक गोल्ड आणि सी ब्लू गाऊनसह न्यूड मेकअप केला होता.
तिने आपले केस पोनीटेलमध्ये स्टाईल केले. फोटो सेशन दरम्यान जान्हवीने एका फोटोग्राफरच्या चष्म्याकडे पाहिले आणि म्हणाली, मला तुझा सनग्लासेस आवडतात. दरम्यान, जान्हवीने ‘अंग्रेजी मीडियम’, ‘रूही’, ‘वालिमाई’, ‘दोस्ताना २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून जान्हवीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. अलीकडेच जान्हवी कपूर वरुण धवनसोबत तिच्या आगामी ‘बावल’ चित्रपटासाठी परदेशात शूटिंग करताना दिसत आहे.