प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या बाॅलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे. जान्हवी कपूरने स्वतः च्या कर्तुत्वाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीने अल्पावधीतच खूप फॅन फॉलोइंगही वाढवले आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी अनेक क्रिएटिव्ह एड्समध्येही दिसते. यासोबतच तिला सोशल मीडिया सेन्सेशन देखील म्हटले जाते. जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 2018 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कपूर घराण्याची लाडली जान्हवी कपूर ही अशीच एक अभिनेत्री आहे, जिने गेल्या 4 वर्षांत खूप प्रगती केली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवण्यात व्यस्त असताना तिच्या फॅशन सेन्सने आधीच लोकांची मने जिंकली आहेत. जान्हवी नेहमीच तिच्या बो’ल्ड लूकने धुमाकूळ घालताना दिसते. अभिनेत्री जान्हवीचे जिम लूक देखील खूप लोकप्रिय आहेत. बॉडी फिट ठेवण्यासाठी ती वर्कआउट करायला विसरत नाही.
जान्हवी दररोज तिचे असे फोटो शेअर करत असते ज्यामुळे लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. कधी पारंपारिक कपड्यांमध्ये तर कधी मॉडर्न अवतारात जान्हवीची हटके स्टाइल अनेकदा पाहायला मिळते. जान्हवी केवळ फॅशनेबल अभिनेत्री नाही तर ती जोखीम घेणारी देखील आहे. कारण जान्हवी तिच्या अनेक फोटोंमुळे ट्रोलही झाली आहे. मात्र, या गोष्टींना तिची हरकत नाही आणि ती तिचे फोटो धाडसाने पोस्ट करते.
सध्या जान्हवी कपूर तिच्या गुडलक जेरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, ती अशा पोशाखांमध्ये तिचे फोटो शेअर करत आहे, जे पाहून चाहते कमेंट्स आणि लाईकचा पाऊस पाडत आहेत. आता अलीकडेच, तिच्या प्रमोशनल शूट्समधून मोकळे होत जान्हवीने एक फोटोशूट केले आहे, जे पाहून चाहते हैराण झाले आहेत.
यावेळी जान्हवीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. प्रसिद्ध फ्रेंच फॅशन डिझायनर अलेक्झांड्राच्या कलेक्शनमधून निवडलेला ड्रेस जान्हवीचा लूक आणखी ग्लॅमरस करत आहे. जान्हवीची अतिशय ग्लॅमरस स्टाइल ब्ल’ड रेड गाऊनमध्ये पाहायला मिळत आहे. जान्हवी या चमकदार पॅटर्नच्या गाउनमध्ये खूप बो’ल्ड आणि सुंदर दिसत आहे.
तिने या ड्रेसवर कोणतीही ज्वेलरी परिधान केलेल्या नाहीत. आणि केस वन साईड घेऊन छान पोज दिली आहे. तिच्या ड्रेससोबत तिने मॅचिंग बूट घातले आहेत. ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. यूजर्ससोबतच सेलेब्सनीही तिच्या फोटोवर जोरदार कमेंट्स केल्या आहेत. सारा अली खानने जान्हवीच्या फोटोवर फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर अर्जुन कपूरने लिहिले की – लग्नाची वेळ आली आहे. तसेच जान्हवी कपूर अखेरची ‘रुही’ चित्रपटात दिसली होती.