टीव्ही मालिकांच्या जगात मागील एका दशकापासून आपलं वर्चस्व टिकवून असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिकेचं क्रेझ आजही अबाधित आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. आजवर मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळे ही मालिका तब्बल १४ वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
या लोकप्रिय मालिकेतील प्रमुख अभिनेत्यानं ही मालिकेला रामराम ठोकणा अशी चर्चा सध्या सुरू आहे. सुप्रसिद्धू लेखक शैलेश लोढा हे त्यांच्या तारक मेहता या व्यक्तिरेखेसाठी घराघरात ओळखले जातात. टीव्हीवरील लोकप्रिय सिटकॉम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ते गेल्या 14 वर्षांपासून हे पात्र साकारत आहे. प्रेक्षकांच्या हृदयात त्याचे वेगळे स्थान आहे.
जेव्हा दिवसाचा एपिसोड संपतो, तेव्हा तारक मेहता लोकांना सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देताना दिसतो. शैलेश लोढा शो सोडणार असल्याची बातमी आली होती. त्याच्या निर्मात्यांशी मतभेद झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र, शोच्या निर्मात्यांनीही याबद्दल उघडपणे सांगितले नाही. आता ‘तारक’ खरोखरच शो सोडणार असल्याचं दिसत आहे, कारण त्याच्या नवीन शोचा टीझर समोर आला आहे.
दरम्यान, शैलेश यांनी हिंदी कवितेच्या दोन ओळी शेअर केल्यात.’हां मजबूत से मजबूत लोहा टूट जाता है कई झूठे इकठ्ठे हों, तो सच्चा टूट जाता है.’शैलेश यांनी लिहिलेल्या या दोन ओळी नेमक्या कोणासाठी आहेत, याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
नेहा मेहता :- सुरुवातीपासून ते 2020 पर्यंत, तिने तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये अंजली मेहताची भूमिका साकारली होती परंतु लॉकडाऊननंतर ती शोमध्ये परतली नाही. तिला तिच्या करिअरमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून तिने हा शो करण्यास नकार दिला. त्यानंतर सुनैना फौजदार ही भूमिका साकारत आहे.
गुरु चरण सिंह :- गुरू चरण सिंगने आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी शो सोडला आणि आता त्याच्या जागी दुसरे कोणीतरी हे पात्र साकारत आहे. 2008 ते 2013 या कालावधीत गुरू चरण सिंहने भुमिका साकारली होती आणि त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु 2013 मध्ये त्यांनी शो सोडला. गुरु चरण सिंग यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर त्यांनी शोला अलविदा केला.
भव्य गांधी :- भव्य गांधी यांनी या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेत त्यांना खूप पसंतीही मिळाली होती. पण अनेक वर्षांपूर्वी त्याने या शोला अलविदा केला होते. सध्या राज त्याच्या जागी शोमध्ये टप्पूच्या भूमिकेत दिसत आहे.
कवी कुमार आझाद :- तारक मेहता शोमध्ये डॉक्टर हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांनी 2009 पासून शेवटच्या श्वासापर्यंत शोमध्ये दमदार काम केले. अभिनयाच्या जोरावर लोकांचे खूप मनोरंजन केले. 2018 मध्ये त्यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्मल सोनी यांना या शोसाठी कास्ट करण्यात आले होते.
झील मेहता :- तारक मेहता शोमधील सोनूचे पात्र लोकांना खूप आवडते आणि झील मेहता या व्यक्तिरेखेलाही खूप आवडले होते. पण अभ्यासामुळे त्याने ही भूमिका सोडली. यानंतर तिच्या जागी निधी भानुशालीला या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले.