आयुष्यात येऊन सर्वजण प्रेम करतात मात्र हे प्रेम क्वचितच काही लोकांनाच मिळत. असच काहीस बॉलिवूडच्या कलाकारांबाबत देखील घडल आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केले पण पुढे जाऊन ते एकत्र राहू शकले नाहीत. एकमेकांना प्रेमाच्या शब्दात दिल्या परंतु पुढे जाऊन साथ देताना त्या तोडल्या.
तर काही असे आहेत जे एकमेकांवर प्रेम नसून देखील केवळ लग्न झाल्यामुळे एकत्र राहतात. याशिवाय असे काही कलाकार आहेत ज्यांनी आतापर्यंत तीन ते चार लग्ने केली आहेत. आजच्या काळात असे काही कलाकार एकमेकांना डेट करत आहेत, ज्यांच्या वयात खूप अंतर आहे.
अशाच एका जोडप्याबद्दल जाणून घेऊया जे पूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. हे जोडपे दुसरे कोणी नसून दिग्गज कलाकार शक्ती कपूर यांची मुलगी आणि बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर होते. एकेकाळी दोन्ही कलाकार एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. नुकताच त्याच्याबद्दलचा एक खुलासा चांगलाच व्हायरल होत आहे.
नुकत्याच या खुलाशात श्रद्धा, फरहान आणि शक्ती कपूर यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. हा खुलासा व्हायरल झाल्याने चाहते देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. या खुलाशात असे सांगितले जात आहे की, शक्ती कपूर यांना हे नाते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी फरहानसोबत असे काही केले, ज्यामुळे ते चर्चेत राहतात.
अनेकदा श्रद्धा कपूर आणि अभिनेता, गायक फरहान अख्तरसोबत अनेक प्रसंगी एकमेकांसोबत दिसले. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा देखील सोशल मीडियावर वेगाने रंगू लागल्या होत्या. असे म्हटले जाते की, एकदा श्रद्धा फरहानला त्याच्या घरी भेटायला गेली होती. त्यावेळी तिचे वडील देखील तिच्या मागे गेले होते.
शक्ती कपूर यांना असं काही दिसलं की, ते प्रचंड चिडले आणि श्रद्धाला रागाच्या भरात “तू मुलगी म्हणवण्याच्या लायकीची नाहीस,” असे म्हणले. त्यानंतर ते श्रद्धाच्या हाताला धरून तिला ओढून घरी घेऊन गेले. श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
दोघे लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे शक्ती कपूर यांना आवडले नाही. कारण त्यावेळी फरहानचे लग्न झाले होते आणि तो श्रद्धापेक्षा मोठा होता. यामुळे त्यांनी श्रद्धाला फरहानपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि बरेच काही समजावून सांगितले. पण श्रद्धाला हे मान्य नव्हते.
आणि वडिलांना असे रागवताना पाहून अभिनेत्रीने आपले सर्व सामान बांधले आणि फरहानसोबत त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेली. यानंतर शक्ती कपूर त्यांची मेहुणी पद्मिनी कोल्हापुरीसोबत फरहानच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला आणि जबरदस्तीने श्रद्धाला घराबाहेर काढले.
त्याचवेळी त्यांनी फरहानला खूप समजावले की, त्याने आपल्या मुलीपासून दूर राहावे. त्यानंतर शक्ती कपूर आपल्या मुलीला कारमध्ये बसवून आपल्यासोबत घरी घेऊन गेले. त्याचवेळी त्यांना हे करताना पाहून फरहानच्या शेजाऱ्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर हे प्रकरण बराच काळ चर्चेत राहिले.
प्रसिद्ध अभिनेता, गायक फरहान अख्तर व्यतिरिक्त, आदित्य रॉय कपूरसोबतही श्रद्धाच्या अफेअरची चर्चा होती. ‘आशिकी 2’ चित्रपटात एकत्र काम करताना दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जाते. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉलिवूडला भन्नाट चित्रपट दिले आहेत.
श्रद्धा कपूरने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘तीन पत्ती’ या सिनेमातून केली होती. मात्र, तिला यश फक्त आशिकी २ या चित्रपटातूनच मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आणि 2013 साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला होता. ‘आशिकी 2′ च्या अफाट यशामुळे त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या.
श्रद्धा कपूर चित्रपट जगताशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा अभिनय खूप आवडला आहे. ‘आशिकी 2′ मधील श्रद्धाच्या अभिनयाला खूप प्रोत्साहन मिळाले. सध्या श्रद्धा रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. रोहन श्रेष्ठ हा बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. हे दोघे अनेक प्रसंगात एकत्र दिसले आहे.