चित्रपट सृष्टीत बिंधास्त आणि बेधडक वक्तव्य करणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच राजकीय विषयांवर किंवा इतर विषयांवर बोलताना दिसते. अनेकदा राखी तिच्या वक्तव्यामुळे वा’दाच्या भोवऱ्यात अडकते.
राखी चाहत्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर करते. राखीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत धुमाकूळ घालतात. त्यावरून राखीला अनेकदा ट्रोल देखील केले जाते.
अभिनेत्री राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी शर्लिनने राखी आणि तिच्या बॉयफ्रेंडची खिल्ली उडवली होती.
यावर आता राखीने सडेतोड उत्तर देताना शर्लिन चोप्राची खिल्ली उडवली आहे. राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केला आहे. शर्लिन चोप्राने २०१८ मध्ये मी टू कँपेन अंतर्गत साजिद खानवर लैं’गिक शो’षणाचे आरो’प केले होते. सध्या साजिद खान ‘बिग बॉस १६’ चा भाग बनला आहे.
साजिद खान बिग बॉसमध्ये आल्याने शर्लिन चोप्रा कडाडली आहे. तिने बिग बॉस निर्मार्ते, सलमान खानवरही खोचक शब्दात टीका केली. त्याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही तिने पत्र लिहून साजिद खानला शो बाहेर करण्याचे सुचवले आहे.
बिग बॉसमध्ये साजिद खानची एंट्री झाल्यापासून #MeToo मोहिमेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. साजिदला शोमधून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. इतकेच नाही तर अनेक अभिनेत्रींनी मीडियासमोर साजिदबाबत अनेक खुलासेही केले.
एवढेच नाही तर त्यांनी साजिदवर गंभीर आरो’पही केले आहेत, त्यातील एक शर्लिन चोप्रा आहे. शर्लिननेही साजिदविरुद्ध गु’न्हा दा’खल केला आहे, पण मुंबई पो’लिस साजिद खानला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी साथ देत नसल्याचा दा’वा अभिनेत्रीने केला आहे.
शर्लिनच्या या वक्तव्यानंतर राखी सावंत साजिद खानच्या समर्थनार्थ बोलताना दिसली. राखीने यापूर्वी शर्लिनची खिल्ली उडवली होती, तर आता शर्लिन चोप्रानेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. साजिदला तिचा भाऊ म्हणत राखीने दा’वा केला होता की, ‘साजिद दोषी नाही.
त्याच्याविरु’द्ध कोणीही साक्ष दिली नाही, न्या’यालयाने साजिद खानला फा’शीची किंवा काळ्या पाण्याची शि’क्षा दिली नाही. तुम्ही चार किलो मेक-अप लावता, साडी नेसता आणि मीडियासमोर इतरांना दो’ष देता. लाज वाटत नाही का? तू पूर्ण पाण्यात का बुडत नाहीस?’
शर्लिन चोप्रा असे म्हणाली आहे की, राखी सावंत दर तीन ते चार महिन्यामध्ये बॉयफ्रेंड्स बदलते आम्ही कधी काही बोलतो का? शर्लिन चोप्रा म्हणाली मी असा विचार करते की, ते तिचे खासगी आयुष्य आहे. तसेच ती पुढे बोलताना म्हणाले की, जर तुझा भाऊ साजिद खान निर्दो’ष असेल तर तपास होऊ दे ना…काय प्राॅब्लेम आहे…
मी अशी आणि मी तशी आहे हे बोलायचेच कशासाठी…पापाराझींना शर्लिन म्हणते की, जर एखादी महिला तिचे शरीर दाखवते म्हणणे तिच्यावर रे’प व्हायला पाहिजे का? आता शर्लिनच्या टिकेनंतर राखी सावंत काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
View this post on Instagram