कोरोना म’हामा’रीमुळे सलग दोन वर्ष चित्रपट गृह बंद होती. त्यानंतर चित्रपटगृहाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. खुप दिवसांनी चित्रपट गृह चालू झाल्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट रिलीज होऊ लागले. परंतु, यादरम्यान अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. गेल्या काही दिवसांपासून फ्लाॅप चित्रपटच्या संख्येत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चित्रपट निर्मित्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला बऱ्याच दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. जौहरमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्यावर घराणेशाही आणि उद्योगातील बाहेरील लोकांशी भे’दभा’व केल्याचा आरो’पही आहे. इतकेच नाही तर सुशांत सिंह राजपूतच्या मृ’त्यूनंतर करण जोहरला खूप काही ऐकावे लागले. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून पहायला मिळत आहे.
स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विषय कोणताही असो स्वरा आपले मत मांडायला आणि पंगा घ्यायला अजिबात मागेपुढे पाहत नाही. परिणामी अनेकदा स्वराला वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागते बऱ्याचवेळा तर आपल्या बेधडक शैलीसाठीमुळे स्वराला खूप त्रा’स सहण करावा लागला होतो. नुकतेच स्वरा भास्करने सुशांत सिंग राजपूतच्या मृ’त्यूनंतर टीकेचा सामना करणाऱ्या करण जोहरला पाठिंबा दिला आहे.
स्वरा भास्कर अलीकडेच सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या बॉलीवूड बॉ’यकॉ’ट ट्रेंडबद्दल बोलली. काही दिवसांपूर्वी स्वरानेही अक्षय कुमारचा बचाव केला होता आणि त्याला सॉफ्ट टार्गेट बनवले जात असल्याचे म्हटले होते. आता स्वराने करण जोहरची बाजू घेतली आहे. स्वरा म्हणाली की, 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृ’त्यूच्या वेळी अटॅक मोडमध्ये असलेले लोक करणला टार्गेट करत आहेत.
स्वरा म्हणते की, करणला घराणेशाही आणि चित्रपटांसाठी चांगले-वाईट म्हणणे एक गोष्ट आहे आणि सुशांतच्या मृ’त्यूसाठी त्याला जबाबदार ठरवणे दुसरी गोष्ट आहे. स्वरा भास्करने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘इंडस्ट्रीत भीतीचे वातावरण आहे. आता वा’दात पडू नका, असे सर्वांना वाटते. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला इथे काहीतरी चालले आहे असे वाटू लागले आहे. कोणाला काही न बोललेलेच बरे.
केव्हा काय होईल हे कळत नाही या भीतीने प्रत्येकालाच भीती वाटते. आता कोणालाच कशावरही मत द्यायचे नाही. स्वराने करण जोहर आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृ’त्यूच्या वेळी ज्या सेलिब्रिटींना टार्गेट केले होते त्यांचे उदाहरण दिले. स्वरा म्हणाली की, करण जोहरसारख्या सेलिब्रिटींवरही ह’ल्ला झाला होता. पण कोणीही काहीही बोलले नाही, कारण प्रत्येकजण ट्रोल आणि टीकेने चिंतेत होता.
ते काही बोलला तर उपयोग होणार नाही, अशी भीती सगळ्यांना वाटत होती. स्वरा पुढे म्हणाली, तुम्हाला करण जोहरचे चित्रपट कमी दर्जाचे वाटू शकतात. त्याच्या नेपोटिझममध्ये समस्या असू शकते. पण तुमच्या समस्या आणि नापसंतीचा अर्थ असा नाही की तो खु’नी आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वातील सध्या स्वरा आणि करण जोहर चर्चेत आहेत. स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले.
तर तिचा जहां चार यार नुकताच रिलीज झाला आहे, पण बॉक्स ऑफिसवर काही विशेष दाखवला नाही. यापूर्वी स्वराने स्वत:ला अक्षय कुमारच्या विचारसरणीपेक्षा वेगळे असल्याचे सांगितले होते. स्वराने अक्षयच्या चित्रपटाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही कलाकार असल्याचे सांगितले. तसेच आपण सत्य असणा-या चित्रपट आणि कथा बनवायला हव्यात, ज्यात प्रचार आहे असे नाही, असेही सांगितले आहे.