करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण करिष्मा आणि अक्षय खन्नाच्याही लग्नाची बोलणी झाली होती याबद्दल तुम्हाला माहीत आहे का. करिष्माची आई बबिता दोघांच्या नात्यात आली नसती तर आज करिष्मा आणि अक्षय पती- पत्नी असते.
करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे:- करिष्मा कपूरचा अनेक वर्षांपासून एकही सिनेमा आला नाही. तर अक्षय मोजक्या सिनेमांमध्ये दिसतो. एक काळ असा होता जेव्हा दोघंही नावाजलेले कलाकार होते. अक्षयने आजपर्यंत लग्न केलं नाही आणि करिष्मा कपूरचा घटस्फो-ट झाला.
दिर्घकाळ एक्टिंगच्या दुनियेतून दूर राहिलेल्या करिश्माने 2012 मध्ये डेंजरस इश्क मधून कमबॅक केले. परंतु हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. सध्या ती विविध मॉडलिंग प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.
रणधीरला कपूर यांना हव होत हे लग्न:- अक्षय खन्नाने बॉर्डर ताल हलचल दिल चाहता है हमराज अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रिपोर्टनुसार रणधीर कपूर यांना करिष्माचं अक्षयशी लग्न व्हावं अशी इच्छा होती.
बबिता यांची या नात्याला मान्यता नव्हती:- मीडिया रिपोर्टनुसार रणधीर यांनी अक्षयच्या वडिलांशी लग्नाबद्दल बोलणीही केली होती. मात्र बबिता यांना हे नातं मान्य नव्हतं. कारण करिष्माने करिअरच्या शिखरावर असताना लग्न करावं अशी त्यांची इच्छा नव्हती.
1991 मध्ये करिश्मा फक्त 17 वर्षांची होती त्यावेळी तिने मुरलीमोहन रावची प्रेम कैदी या सिनेमातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला. 1996 मधील सुपरहिट फिल्म राजा हिन्दुस्तानी साठी तिला पहिल्यांचा फिल्मफेयरचा बेस्ट एक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता.
अभिषेक बरोबरच्या लग्नाबद्दलही बातम्या आल्या:- मीडिया रिपोर्टनुसार करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनशी होणार होतं. मात्र एका अयशस्वी अभिनेत्यासोबत करिष्माचं लग्न व्हावं अशी बबिता यांची इच्छा नव्हती. म्हणून हे लग्न ही मोडलं.
करिश्माचे लग्न अयशस्वी झाले:- अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं आणि करिष्माने व्यावसायिक संजय कपूरशी. दरम्यान काही वर्षांनंतर करिष्माने संजयला घटस्फोट दिला. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना करिष्मानं उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केलं होतं.
मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद झाले. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मागील वर्षी तिचा संजय कपूरशी रीतसर घटस्फोट झाला.
म्हणूनच अक्षयने लग्न केले नाही:- एका मुलाखतीत अक्षयने त्याला मुलं आवडत नसल्यामुळे लग्न केलं नाही असं सांगितलं होतं. याशिवाय त्याला लग्न करण्यातही फारसं स्वारस्य नसल्याचं तो बोलला होता. असं असलं तरी रिया सेन आणि तारा शर्मासोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं.
करिष्माचे लग्न आणि घटस्फोट:- 90’s च्या जिगर राजा बाबू सुहाग कुली नं.1 गोपी किशन साजन चले ससुराल’ आणि जीत सारख्या सुपरहिट फिल्म दिलेल्या करिश्माने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. त्यांना समायरा आणि कियान हे दोन मुलं आहेत. परंतु नंतर त्यांचा घटस्फो ट झाला आता ते वेगळे झाले आहेत.
घटस्फो टानंतर दोन्ही मुलांच्या नावावर 10 कोटी रुपयांची ट्रस्ट केली आहे. तर ज्या डुप्लेक्समध्ये करिश्मा राहते तो तिच्या नावावर आहे. याव्यतिरिक्त संजयला मुलांचे शिक्षण आणि इतर खर्च उचलायचा आहे. समायरा आणि कियाने दोन्हीही मुलं करिश्मासोबत राहतील. तरीही संजयला त्यांना भेटण्याचा अधिकार आहे.