आईने पोटच्या मुलीलाच दिला धोका, तिच्याच बॉयफ्रेंडला गटवलं अन्…

Bollywood Entertenment

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं’ असं म्हटलं जाते. पण या प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत. आपण पाहतो काही लोक प्रेमासाठी जीव द्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. असाच प्रेमाविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. चक्क आईचे आपल्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत सूत जुळलं आणि हे प्रकरण आणखी वाढत गेल आहे.

प्रत्येक नात हे विश्वासावर टिकत असं म्हटले जाते. आई आणि मुलीच नातं हे पवित्र नात समजल जाते. आई ही मुलीची पहिली मैत्रीण समजली जाते. पण आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा विश्वास घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीने आपल्याबरोबर झालेल्या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे‌.

आईच्या गरोदरपणाचे सत्य ऐकून एका महिलेला धक्काच बसला. चक्क आईने स्वतः च्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबं’ध ठेवले आहे आणि ती आता एका मुलाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेने याबाबत सांगितले आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. महिलेने आपल्या आईच्या या कृतीला ‘सर्वात मोठा विश्वासघा’त’ असे म्हटले आहे.

वेनेसा असे या महिलेचे नाव आहे. ती अमेरिकेची रहिवासी आहे. तिने सांगितले की, ती सुट्टीसाठी मेक्सिकोला गेली होती. तेव्हा तिचा प्रियकर घरी होता. त्यावेळी अमेरिकेत गर्भपातावर बं’दी घालण्यात आली होती. व्हिडिओमध्ये वेनेसा म्हणाली, मी मैत्रिणींसोबत मेक्सिकोमध्ये होते. गर्भपात बंदीची बातमी समजल्यानंतर मी सर्व महिलांना फोन करून त्यांची तब्येत विचारत होते.

वेनेसा पुढे म्हणाली, जेव्हा मी माझ्या आईला फोन केला तेव्हा ती रडू लागली. मला वाटले की गर्भपात बंदीचा इतर महिलांवर काय परिणाम होईल याची आईला काळजी असेल. मात्र, गर्भपात बंदी हे तिच्या आईच्या त्रासाचे कारण असू शकत नाही हे वेनेसाला समजू लागले. दोन दिवसांनंतर वेनेसाने तिच्या आईला पुन्हा फोन केला.

ती अजूनही रडत होती. काही काळानंतर, आईने वेनेसाला सांगितले की, ती गर्भवती आहे. हे ऐकून वेनेसा खूप आनंद झाला. कारण ती बहीण होणार होती. पण दुसऱ्याच क्षणी वेनेसाला मोठा धक्का बसला. हे मूल तिच्या प्रियकराचे असल्याचे आईने तिला सांगितले. वेनेसा म्हणाली, मी माझ्या आईला पुन्हा विचारले.

कारण मी मेक्सिकोमध्ये होते आणि नशेत होते. तिने पुन्हा माझ्या प्रियकराचे नाव घेतले. आईचे बोलणे ऐकून वेनेसाला आश्चर्य वाटले. तिने फोन ठेवला आणि लगेचच आई आणि प्रियकराला ब्लॉक केले. त्यावेळी वेनेसा ट्रिप अर्धवट सोडून घरी परतली. आईचे घर सोडून ती दुसरीकडे राहायला गेली.

घरी परतल्यानंतर प्रियकराने वेनेसाचे मन वळवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण आजपर्यंत ती ना तिच्या प्रियकराशी बोलली ना आईशी. वेनेसाचे म्हणणे ऐकल्यानंतर लोकांनी आई आणि प्रियकरावर संताप व्यक्त केला. दरम्यान, सोशल मीडियावर या तरुणीसोबत झालेल्या विश्वासघा’ताची ही कहाणी जोरदार धुमाकूळ घालत आहे.

नेटकरी तिची ही कहाणी ऐकून तिच्या आईवर संताप व्यक्त करत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक कडवट कमेंट केल्या आहेत. एवढे सर्व होऊन देखील तरुणाने वेनेसाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वेनेसाने त्याला आणि आपल्या आईला माफ केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *