बॉलीवूडचे चकाचक जग पाहून लोकांना वाटते की त्यात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच आरामदायी आहे. महागडे डिझायनर कपडे परिधान करून परदेशात फिरणाऱ्या या कलाकारांना वेदनांची काहीच माहिती नसते असे देखील वाटते. इतकंच नाही तर पडद्यावर दिसणार्या या कलाकारांना नेहमी हसताना पाहून त्यांच्या आयुष्यात कोणतंही दु:ख नसतं, असं सर्वसामान्यांना वाटतं. मात्र, या सर्व गोष्टी खोट्या असतात.
श्रीमंत असो की गरीब, सुखी असो वा दुःखी हे कलाकार पडद्यावर दिसत असले तरी या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातही खूप काही सहन कराव लागत. अनेक चॅट शो आणि मुलाखती दरम्यान बोलताना कलाकार नकळत अशाच काही गोष्टी सांगून जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांना त्यांच्या आई-वडिलांचे प्रेम मिळाले नाही.
बॉलीवूडची पंगा क्विन कंगना राणौत नेहमी चर्चेत असते. कंगना बोलली आणि वा’द झाली नाही असं कधी होतच नाही. त्यामुळे अनेकदा कंगनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना कंगनाने तिच्या आयुष्यातील काही कठीण क्षणांबद्दल सांगितले आहे.
कंगना म्हणते की, माझे वडील मी अभिनेत्री होण्याच्या विरो’धात होते. त्यांची मुळीच इच्छा नव्हती की मी अभिनेत्री व्हावं. इतकच नाही तर मी अभिनेत्री होणार हे समजतात माझ्या वडिलांनी मला मा’रहा’ण करणे सुरू केले. त्याचवेळी कंगना हीरोइन बनण्यासाठी मुंबईत आणि तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्याशी बोलणे सोडून दिले होते. कंगनाचे वडील कित्येक वर्ष तिच्यासोबत बोलत नव्हते.
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेलनेही तिच्या आई-वडिलांच्या वागणुकीची कहाणी माध्यमांशी बोलताना जगासमोर मांडली आहे. अभिनेत्री अमिषाने आपल्या वडिलांवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरो’प केला होता. एवढेच नाही तर विक्रम भट्टसोबतच्या त्याच्या अफेअरबद्दल तिच्या आई-वडिलांना कळल्यावर तिला चप्पलने मा’रहा’ण केल्याचेही तिने सांगितले होते.
प्रसिद्ध अभिनेत्री रेखा या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. रेखा तिच्या बालपणीच्या अनेक आठवणी माध्यमांशी संवाद साधताना सांगता दरम्यान, एकदा माध्यमांशी बोलताना रेखा म्हणाली की, मला माझ्या वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. तिच्या वडिलांनी लग्न केलं होतं आणि त्यांना आनखी मुल होती. त्यामुळे रेखाच्या आयुष्यातून ही वे’दना कधीच दूर झाली नाही.
प्रसिद्ध अभिनेत्री सारिकाचे बालपणही खूप गरिबीत आणि हालात गेले. ती मोठी झाल्यानंतरही तिला आई-वडिलांचे प्रेम कधीही मिळाले नाही. सारिका खूप लहान असताना तिचे वडील आणि आईला एकटीला टाकून सोडून गेले. तिने लहानपणापासूनच बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केली.
असे म्हटले जाते की एकदा सारिकाने तिच्या कामाच्या बदल्यात 15 रुपयांचे पुस्तक खरेदी केले होते, त्यानंतर तिच्या आईने तिला बेदम मा’रहा’ण केली. सारिकाने वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. चित्रपटातील कामामुळे सारिका लहानपणी शाळेतही जाऊ शकली नाही आणि कामातून मिळणारे सर्व पैसे तिची आई स्वत:कडे ठेवत असे.