आजकाल लग्न झालेलं असेल तरी, लग्न झालेलं आहे कि नाही हे कळत नाही. कारण हे लग्न किती दिवस टिकेल किव्हा लग्न झाल्यावर ते एकत्र राहतंय कि नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कित्तेक कपल्स तर असे असतात कि लग्न झालेलं असून ते एकमेकांपासून दूर राहतात.
आपण सर्वांना माहिती आहे कि, लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असतं. आणि जस कि आपल्याला माहिती आहे लग्नानंतर पती पत्नी एकमेकांसोबत एका घरामध्ये राहण्यास सुरुवात करतात.
पण आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनामध्ये एकमेकांना भेटणं एकमेकांसोबत वेळ घालवणं सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं बघायला मिळतंय.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत जी अभिनेत्री वर्षातून फक्त बारा दिवस आपल्या नवर्याला भेटते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री ?
ज्या अभिनेत्री बद्दल आपण आता बोलत आहोत ती अभिनेत्री मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत एक मोठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे राधिका आपटे.
राधिका ही चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे. राधिका आपटेने २००५ मध्ये ‘वाह’ आणि ‘लाईफ हो तो ऐसी’ या दोन मोठ्या चित्रपटांतून चित्रपटसृष्टीमध्ये एन्ट्री केली.
आजपर्यंत तिने हिंदी तेलुगू तमिळ मल्याळम मराठी आणि बंगाली या भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तुमच्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि राधिका चा जन्म तमिळनाडूमधील वेल्लोरे या गावी झाला व त्यानंतर ती पुणे येथे शिफ्ट झाली. तिने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे.
सन २०१२ मध्ये तिने लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याबरोबर लग्नबंधनात अडकली. तुमच्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि आता जवळपास त्यांचा लग्नाला ८ वर्ष पूर्ण होत आलेली आहेत
तरीसुद्धा ती अजूनही ती स्वतःच्या नवऱ्याला केव्हा केव्हा भेटते. मिळालेल्या माहितीनुसार तिने सांगितलं की ते दोघ महिन्यातून एकदाच एकमेकांना भेटतात. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि यामागील कारण हेच की ते दोघेही आपल्या कामात फार व्यस्त असतात. राधिकाने देखील हे स्पष्ट केले आहे कि, प्रेम म्हणजे फक्त एकत्र 24 तास एका घरात राहणं नाही.
तुम्हाला सांगू इच्छितो कि, राधिका आपटेचं लग्न आणि तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीच लग्न होऊन 8 वर्षे झाली याबद्दल तर कवचितच कोणाला कल्पना असेल.
नवरा बायको दोघेही कामामध्ये फार व्यस्त असल्याने राधिका व तिचा पती फार क्वचित म्हणजे फक्त महिन्यातून एकदा भेटतात. म्हणजे 365 दिवसांपैकी 12 दिवस ते एकमेकांना भेटतात आणि बाकीचे दिवस एकमेकांच्या आठवणीत जगतात असं म्हणायला काही वावगं नाही.